29 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरधर्म संस्कृतीसर्वाधिक उंचीच्या ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण

सर्वाधिक उंचीच्या ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान मोदी उपस्थित

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवोत्कम मठात जगातील सर्वात उंच मानली जाणारी भगवान रामांची ७७ फूट उंच कांस्य मूर्तीचे अनावरण केले. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी घडवली आहे.

५५० व्या वर्षाच्या उत्सवानिमित्त 9 संकल्प
श्री संस्थान गोकर्ण पार्टगाळी जीवोत्कम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नऊ महत्त्वपूर्ण आवाहने केली:

पाणी वाचवा, अधिकाधिक झाडे लावा,  स्वच्छतेची सवय जोपासा, स्वदेशी उत्पादने वापरा आणि प्रोत्साहन द्या, देशदर्शन – भारताच्या विविध भागांना भेट देऊन देशाची ओळख वाढवा, नैसर्गिक शेतीच्या पद्धती अंगीकारा, आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा – बाजरी (मिलेट्स) अधिक खा आणि तेलाचे सेवन 10% ने कमी करा, दैनंदिन जीवनात योग आणि क्रीडा सामील करा, शक्य त्या सर्व प्रकारे गरिबांना मदत करा.

हे ही वाचा:

देशाचे भविष्य घडवणारेच नाहीत, तर परंपरेचे संरक्षकही आहेत युवक

अल- फलाह संस्थापकाचा जमीन घोटाळा; मृतांना दाखवले जमिनीचे मालक

मुलाला झाडाला लटकवले

आरोग्यासाठी वरदान – विधारा

मोदी म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण आणि जबाबदार जीवनशैली ही विकसित भारताच्या दृष्टीकोनासाठी अत्यावश्यक आहे.

स्मरणिका नाणे व टपाल तिकीटाचे अनावरण
या सोहळ्यात पंतप्रधानांनी मठाच्या ५५० वर्षांच्या स्मरणार्थ एक स्मरणिका नाणे आणि विशेष टपाल तिकीटही जारी केले.

भगवान रामाच्या मूर्तीच्या अनावरणावेळी भाषण
गोव्यातील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अयोध्येतील राम मंदिरात त्यांनी पवित्र ध्वज फडकवल्यानंतर काहीच दिवसांत जगातील सर्वात उंच भगवान रामाच्या मूर्तीचे अनावरण करण्याचा योग आल्याने त्यांना अपार आनंद होत आहे.

प्राचीन मठातील भव्य सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सुमारे ३.४५ वाजता मठात दाखल झाले. त्यांच्या लँडिंगसाठी मठाच्या परिसरात विशेष हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. मठ संकुलातील मंदिराला भेट दिल्यानंतर ते सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.

गोवा राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने या सोहळ्यास हजेरी लावली. गेल्या काही वर्षांत मठात झालेल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी हा एक आहे.

अद्वितीय शिल्पकृती
७७ फूट उंच कांस्याची ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली आहे. सुतार यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ यूनिटी तयार केली. गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की ही मूर्ती जगातील सर्वात उंच भगवान रामांची मूर्ती ठरणार असून मठाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वात भर घालणार आहे.

५५० वर्षांची परंपरा
मठाच्या ५५० वर्षांच्या परंपरेनिमित्त २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काणकोणातील पार्टागाळ येथे असलेला हा मठ ३७० वर्षांपूर्वी स्थापन झाला असून आजही एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो.

कार्यक्रमांच्या काळात दररोज ७  ते १० हजार भक्तांच्या भेटीची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मठ संकुलाचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले असून, आध्यात्मिक वातावरण कायम ठेवत परिसराला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा