28.9 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषपश्चिम बंगलमध्ये राम मंदिर बांधणार!

पश्चिम बंगलमध्ये राम मंदिर बांधणार!

मशिदीच्या पायाभरणीनंतर भाजप नेत्याने लावले पोस्टर

Google News Follow

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. अशातच राज्यात मंदिर आणि मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. कोलकात्याच्या सॉल्ट लेक परिसरात अनेक ठिकाणी पोस्टर्स दिसले, ज्यात पूर्व कोलकात्यामध्ये अयोध्या धर्तीवर एक भव्य राम मंदिर संकुल बांधण्याचा दावा करण्यात आला होता. पोस्टर्समध्ये शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रम आणि इतर कल्याणकारी सुविधांसह एका मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. हे पोस्टर्स स्थानिक भाजप नेते आणि पक्षाच्या विधाननगर युनिटचे माजी अध्यक्ष संजय पोयरा यांच्या नावाने लावण्यात आले होते.

सिटी सेंटर, करुणामोयी आणि इतर प्रमुख भागात लावण्यात आलेले हे पोस्टर्स अयोध्या धर्तीवर बनवलेल्या राम मंदिराबद्दल आहे. तसेच लोकांना मंदिराच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक रुपया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे पोस्टर्स अशा वेळी आले लावण्यात आले आहेत जेव्हा ६ डिसेंबर रोजी बाबरी ढाचा पाडल्याच्या दिनानिमित्त, मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये मशिदीची पायाभरणी केली. प्रत्युत्तर म्हणून, भाजपने त्याच दिवशी मुर्शिदाबादमधील बांजातिया येथील मनिंद्र नगर येथे राम मंदिराचा भूमिपूजन समारंभ आयोजित केला, ज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला.

संजय पोयरा यांनी याचे वर्णन रामराज्याच्या संकल्पनेवर आधारित एक सामाजिक-आध्यात्मिक चळवळ असे केले. पोयरा यांनी म्हटले आहे की रामाच्या राज्यात राम मंदिर असलेच पाहिजे. त्यांनी जमिनीच्या स्थानाबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की अनेक लोकांनी आधीच जमीन, बांधकाम साहित्य आणि मूर्ती दान करण्याची ऑफर दिली आहे, परंतु जर स्थान सार्वजनिकरित्या उघड केले तर अडथळे येऊ शकतात. पोयरा यांनी घोषणा केली की भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ २६ मार्च रोजी म्हणजेच राम नवमी रोजी सकाळी १० वाजता होईल.

हेही वाचा..

“युनूस सरकारने अपमानित करून बाजूला सारले!”

कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

डिजिटल अरेस्ट सायबर फसवणूक : १३ संशयितांविरुद्ध चार्जशीट दाखल

पुणे आईएसआयएस मॉड्यूल केस: ईडी, एटीएसची छापेमारी

पुढे त्यांनी म्हटले की, जर लोकांना मंदिराच्या बांधकामासाठी १ रुपयाही दान करायचा असेल तर ते आनंदाने स्वीकारतील असे त्यांनी सांगितले. प्रस्तावित संकुलात गरिबांसाठी रुग्णालय, मुलांसाठी शाळा, वृद्धाश्रम आणि महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रमांचा समावेश असेल असा दावाही पोस्टर्समध्ये करण्यात आला आहे. पोयरा यांच्या मते, हे त्यांच्या रामराज्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे, ज्यामध्ये भक्ती आणि सार्वजनिक सेवा यांचा मेळ आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा