26 C
Mumbai
Saturday, February 28, 2026
घरबिजनेसअनिल अंबानी यांच्या निवासस्थान, कार्यालयावर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी यांच्या निवासस्थान, कार्यालयावर सीबीआयचे छापे

बँक ऑफ बडोदा फसवणूक प्रकरण: २,२२० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

Google News Follow

Related

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) चे प्रवर्तक अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. बँक ऑफ बडोदाने केलेल्या २,२२० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला असून ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
बँक ऑफ बडोदाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सीबीआयकडे रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, आरकॉमने घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केला आणि बनावट व्यवहारांच्या माध्यमातून हा पैसा इतरत्र वळवला. यामुळे बँकेचे २,२२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तपासादरम्यान कंपनीच्या खात्यांमध्ये फेरफार केल्याचे आणि अनियमितता लपवल्याचेही समोर आले आहे.

हे ही वाचा:

गोवा नाईटक्लब आग प्रकरणात १३ जणांवर आरोपपत्र

हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांनी केली पोलखोल

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष

‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाला स्थगिती! कारण काय?

कोर्टाची स्थगिती उठल्यानंतर कारवाई

हे कर्ज खाते २०१७ मध्येच ‘थकबाकी’ (NPA) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या खात्याला ‘धोकादायक’ किंवा ‘फ्रॉड’ घोषित करण्यास स्थगिती मिळाली होती. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्थगिती उठल्यानंतर बँक ऑफ बडोदाने तात्काळ सीबीआयकडे तक्रार केली.

दुसरा गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) तक्रारीवरून सीबीआयने आरकॉमवर यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बँक ऑफ बडोदाचा हा व्यवहार वेगळा असून तो पूर्वीच्या विजया बँक आणि देना बँक (ज्या आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या आहेत) यांच्याशी संबंधित आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या झडतीमध्ये या कर्ज व्यवहाराशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा