33 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरधर्म संस्कृती'आयुष्यातील सर्वात मोठी चूक' म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म

‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक’ म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म

सायली होती मिस इंडिया अर्थ २०१९ची विजेती

Google News Follow

Related

मिसेस इंडिया अर्थ २०१९ विजेती सायली सुर्वे यांनी आपल्या मुस्लिम पतीकडून झालेल्या कथित छळानंतर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असलेल्या सुर्वे यांनी “शुद्धीकरण प्रक्रिया” पूर्ण केली असून आता त्यांनी आपले नाव आद्या सुर्वे असे ठेवले आहे.

कुटुंबाच्या विरोधानंतरही सुर्वे यांनी २०१९ मध्ये मिरा-भाईंदर येथील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांचे नाव अतीजा तासे असे ठेवण्यात आले. मात्र त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही.

माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या पतीवर गंभीर आरोप केले. “आतिफ तासेशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,” असे त्या म्हणाल्या. लग्नानंतर लगेचच छळ सुरू झाल्याचा आणि आपल्याला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. या छळाबाबत त्यांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

अमेरिकेच्या फेडरल सरकारी नेटवर्कमधून ‘क्लॉड एआय’ हटवणार?

चीनच्या स्टेल्थ फायटरला भारताचे ‘घातक’ उत्तर!

भारताचा विजय ‘गिफ्ट’ होता; मोहम्मद आमिरचा विचित्र दावा

‘धुरंधर: द रिवेंज’: रिलीजपूर्वीच दोन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

काही महिन्यांचा छळ सहन केल्यानंतर त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याने त्यांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हवन आणि मंत्रोच्चार करून त्यांची “शुद्धीकरण प्रक्रिया” पूर्ण करण्यात आली.

या वेळी बोलताना सुर्वे म्हणाल्या, “अशा गोष्टी कोणत्याही मुलीने हे सहन करू नये. देवाने आपल्याला आयुष्य अशा रावणांसमोर हार मानण्यासाठी दिलेले नाही. निराश होऊ नका. मी माझ्या चार मुलांमुळे दहा वर्षे तिथे राहिले. मुलांकडे पाहताना आई म्हणून घर तुटू नये किंवा मुलांना आई-वडिलांचा आधार मिळू नये असे वाटत नाही. पण माणूस म्हणून माझा संयम संपला. माझ्या मुलांसाठी मला बाहेर पडावे लागले.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा