27 C
Mumbai
Saturday, March 21, 2026
घरक्राईमनामाप्रेमसंबंधातील वादातून तरुणीची आत्महत्या; प्रियकराविरोधात गुन्हा

प्रेमसंबंधातील वादातून तरुणीची आत्महत्या; प्रियकराविरोधात गुन्हा

अँटॉप हिल परिसरात घडली घटना

Google News Follow

Related

प्रेमसंबंधातील वाद आणि मानसिक छळामुळे एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या तरुणीने ८ मार्च रोजी रात्री आपल्या घरातील खोलीत गळफास घेतला. ९ मार्च रोजी सकाळी कुटुंबीयांनी दरवाजा उघडून पाहिले असता ती ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

भारत – इस्रायल शेतीपासून जलसुरक्षेपर्यंत साथ साथ!

‘मोदींनी इराण-इस्रायलला एक जरी फोन केला तरी संघर्ष थांबेल’

एसआरए प्रकल्पासाठी घर पाडल्याने वृद्धाचा मृत्यू

विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!

घटनेनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता घटनास्थळी सहा पानी सुसाईड नोट आढळून आली. ही चिठ्ठी इंग्रजी भाषेत लिहिलेली असून त्यामध्ये संबंधित तरुणीसोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने तिचा अपमान केल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. या अपमानामुळे ती मानसिकदृष्ट्या खचल्याचेही चिठ्ठीत नमूद आहे.

सुसाईड नोटमधील मजकूर आणि कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करून तिचे फॉरेन्सिक परीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मृत्यूमागील नेमके कारण आणि संबंधित तरुणाची भूमिका याबाबत अधिक तपास केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा