32 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरदेश दुनियाआखातातील अमेरिकन लष्करी तळ बंद, निर्बंध हटवा... इराणने युद्धविरामासाठी ठेवल्या कठोर अटी

आखातातील अमेरिकन लष्करी तळ बंद, निर्बंध हटवा… इराणने युद्धविरामासाठी ठेवल्या कठोर अटी

अमेरिकेच्या प्रस्तावाला उत्तर

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चर्चा सुरू करण्याच्या केलेल्या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून, इराणनेही आता त्यांच्या बाजूने प्रस्ताव समोर ठेवला आहे. यात त्यांनी काही अटी समोर ठेवल्या आहेत. आखातातील अमेरिकन लष्करी तळ बंद करण्यापासून ते निर्बंध हटवणे आणि एका महत्त्वाच्या सागरी मार्गावर नियंत्रण मिळवणे अशा व्यापक मागण्या इराणने केल्याचे वृत्त आहे. हे अशा वेळी घडले आहे, जेव्हा तेहरानने वॉशिंग्टनचे वाटाघाटी सुरू असल्याच्या दाव्यांना जाहीरपणे फेटाळून लावले आहे आणि दोन्ही देशांमध्ये कोणताही करार होण्याची शक्यता नाही असे म्हटले आहे.

इराणच्या प्रतिनिधींनी आखातातील सर्व अमेरिकन तळ बंद करण्याची, युद्धकाळातील नुकसानीची आर्थिक भरपाई देण्याची आणि हिजबुल्लाहविरुद्धची इस्रायलची मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी अशा एका आराखड्याचीही मागणी केली आहे, जो इराणला जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याची परवानगी देईल. संघर्ष संपवण्यासाठी होणाऱ्या कोणत्याही कराराचा भाग म्हणून सर्व निर्बंध उठवले जावेत, असा आग्रह इराणनेही धरला आहे.

इराणने सार्वजनिकरित्या कठोर भूमिका घेतली असली तरी, खासगीत तेहरान काही प्रमाणात लवचिकता दाखवत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराण आपला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पाच वर्षांसाठी थांबवण्याचा आणि युरेनियम संवर्धनाची पातळी कमी करण्याचा विचार करू शकतो. ते आपल्याकडील ६० टक्के संवर्धित युरेनियमच्या साठ्याबाबत चर्चा सुरू करू शकतात आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला उर्वरित सेंट्रीफ्यूजची तपासणी करण्याची परवानगी देऊ शकते.

हे ही वाचा:

इराणने पाकिस्तानकडे जाणाऱ्या जहाजाला होर्मुझ ओलांडण्यापासून रोखले

पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून शस्त्र तस्करी करणारे १० तस्कर अटकेत

दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला राज्यसभेवर पाठवा!

दिल्लीतील अकबर रोड, रायसीना रोड येथील कार्यालये रिकामी करण्यासाठी काँग्रेसला नोटीस

यापूर्वी, इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फकारी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या नेतृत्वाची खिल्ली उडवली होती. “अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करत आहे,” अशी टीका त्यांनी केली होती. “तुमचा आंतरिक संघर्ष आता स्वतःशीच वाटाघाटी करण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे का?” असा सवाल त्यांनी विचारात आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या लोकांसोबत कधीच जुळवून घेऊ शकत नाहीत, असा इशारा दिला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा