27 C
Mumbai
Wednesday, April 1, 2026
घरक्राईमनामाम्यानमारमध्ये ‘सायबर गुलामी’चा रॅकेट उघड; मुंबईतील किंगपिनला सीबीआयकडून अटक

म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामी’चा रॅकेट उघड; मुंबईतील किंगपिनला सीबीआयकडून अटक

दिल्लीवरून थायलंडला नेले जात असे

Google News Follow

Related

देशभरातील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमधील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये अडकवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘क्रिश’ याला केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईतून अटक केली आहे.

सीबीआय च्या तपासात उघडकीस आले आहे की, ही संघटित आंतरराष्ट्रीय टोळी भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये आकर्षक नोकरीचे आमिष दाखवत होती. त्यानंतर त्यांना दिल्लीहून बँकॉकमार्गे म्यानमारमध्ये, विशेषतः म्यावाडी परिसरातील ‘केके पार्क’सारख्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या नेले जात होते.

हे ही वाचा:

सोनमर्ग महामार्गावर भीषण हिमस्खलन; ६ जणांचा मृत्यू

“कोणताही लॉकडाउन नाही, ‘टीम इंडिया’सारखे काम करायचे आहे…”

सायना नेहवाल: भारताचा ऑलिम्पिक अभिमान

सीएसकेचा नवा “थाला” संजू सॅमसन?

 

या ठिकाणी नेल्यानंतर संबंधितांना सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात होते. ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक, रोमांस स्कॅम आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळ्यांद्वारे भारतासह जगभरातील लोकांना लक्ष्य करण्यात येत होते. या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांवर मानसिक व शारीरिक छळ, धमक्या आणि हालचालींवर कडक निर्बंध लादले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान, २०२५ मध्ये काही भारतीय नागरिक या सायबर केंद्रांतून पळून जाऊन थायलंडमध्ये पोहोचले होते. त्यानंतर मार्च आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांची भारतात सुटका करण्यात आली. या पीडितांच्या सखोल चौकशीतून या टोळीच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे CBI ने सखोल तपास सुरू केला आणि या जाळ्यामागील प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचले. सुनील उर्फ क्रिश हा या रॅकेटमधील मुख्य समन्वयक असल्याचे निष्पन्न झाले. तो पीडितांच्या बेकायदेशीर हालचाली आणि शोषणात महत्त्वाची भूमिका बजावत होता.

आरोपी नुकताच भारतात परतल्याची माहिती मिळताच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून CBI ने मुंबईत त्याला अटक केली. त्याच्या राहत्या घरावर छापे टाकून म्यानमार आणि कंबोडियाशी संबंधित मानवी तस्करीच्या कारवायांचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आणखी आरोपी, विशेषतः परदेशी नागरिक, यांचा शोध सुरू असून या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संपूर्ण विस्तार उघड करण्यासाठी CBI तपास सुरू ठेवणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा