28.3 C
Mumbai
Wednesday, July 29, 2026
घरविशेषएअर इंडिया अपघात: फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये दोष नाही!

एअर इंडिया अपघात: फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये दोष नाही!

संसदेत केंद्र सरकारची माहिती

Google News Follow

Related

गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विच प्रणालीमध्ये कोणताही तांत्रिक दोष आढळलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी (२९ जुलै) संसदेत दिली. मात्र, विमानाच्या थ्रस्ट कंट्रोल मॉड्यूलची (Thrust Control Module) सखोल तपासणी अद्याप सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) कंपनीने फ्यूल कंट्रोल स्विचची अत्याधुनिक चाचणी केली असून, अमेरिकेतील सिएटल येथे संपूर्ण थ्रस्ट कंट्रोल मॉड्यूलची तपासणी सुरू आहे. मोहोळ यांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) निर्देशानुसार या चाचण्या करण्यात येत आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारच्या विमानांना तात्पुरते सेवाबाहेर काढल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या उड्डाणयोग्यता तपासणीचा हा एक भाग आहे.

त्यांच्या मते, फ्यूल कंट्रोल स्विचची सविस्तर तपासणी करण्यात आली असून, त्यातील लॉकिंग डिटेंट्सच्या (Locking Detents) संरचनात्मक मजबुतीचीही चाचणी घेण्यात आली. या तपासणीत कोणतीही असामान्यता किंवा बिघाड आढळलेला नाही. मात्र, संपूर्ण थ्रस्ट कंट्रोल मॉड्यूलची तपासणी OEM च्या प्रकल्पात अद्याप सुरू असून, त्याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अंतिम निष्कर्षाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) च्या अंतिम अहवालासंदर्भातही स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, अंतिम अहवाल सादर करण्यास कोणताही विलंब झालेला नाही. मोठ्या विमान अपघातांची चौकशी ही वेळखाऊ आणि टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया असते. एआय-१७१ विमान अपघाताचा तपास सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

फेडच्या एका निर्णयावर ठरणार सोन्या-चांदीची दिशा

₹७४,७८२ कोटींच्या बनावट ITC घोटाळ्याचा पर्दाफाश

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!

सरकारी वाहनांच्या वापरावर केंद्राची नवी शिस्त; ‘वन ऑफिसर, वन कार’ नियम

सरकारने एएआयबीकडून अंतिम अहवाल जाणीवपूर्वक लांबवला जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. मोठ्या विमान अपघातांच्या चौकशीसाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नसते. सर्व तपास आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रक्रियेनुसार आणि आवश्यक तांत्रिक तपासणीनंतरच पूर्ण केला जातो, असे सरकारने स्पष्ट केले. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “या अपघातामागील सर्व संभाव्य कारणे आणि त्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या प्रत्येक घटकाची सखोल चौकशी केली जात आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
324,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा