31 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरस्पोर्ट्स'तन्वी भारताची पुढची सुपरस्टार'

‘तन्वी भारताची पुढची सुपरस्टार’

पी. व्ही. सिंधूचे भरभरून कौतुक

Google News Follow

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ताइपे ओपन २०२६चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचे भरभरून कौतुक केले आहे. १७ वर्षीय तन्वीने रविवारी व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्हचा सरळ गेममध्ये पराभव करून बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला.

सिंधूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म **’एक्स’**वर लिहिले की, “तन्वीमध्ये एक विशेष खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. तिच्याकडे प्रतिभा, उत्कृष्ट स्ट्रोक्स आणि मोठ्या खेळाडूंना भिडण्याचे धैर्य आहे. आता तिने सातत्य आणि अनुभवही मिळवला आहे. ही तर तिच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि यशाची भूक कायम ठेव.”

अंतिम सामन्यात तन्वीने केवळ ३६ मिनिटांत २१-१६, २१-१६ अशा सरळ गेममध्ये विजय मिळवत ताइपे ओपन जिंकणारी सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला.

या विजेतेपदासह तन्वी २००८ मध्ये सायना नेहवालनंतर ताइपे ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी दुसरी भारतीय ठरली. तसेच या प्रकारात भारताचा १७ वर्षांचा दुष्काळही तिने संपवला.

यापूर्वी तन्वीने यूएस ओपनमध्ये उपविजेतेपद, तसेच ओडिशा मास्टर्स आणि गुवाहाटी मास्टर्स सुपर १०० स्पर्धांमध्येही उपविजेतेपदाची कामगिरी केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा