33 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरक्राईमनामामुंबई विमानतळावर वृद्ध दांपत्याला लुटले

मुंबई विमानतळावर वृद्ध दांपत्याला लुटले

सोन्याची साखळी आणि रोख रक्कम केली लंपास

Google News Follow

Related

मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका वृद्ध दांपत्याच्या बॅगेतील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाटण्याहून मुंबईत आलेल्या शेखर सहाय (७२) आणि त्यांच्या पत्नी शीला (६४) हे ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुंबईच्या देशांतर्गत विमानतळावर उतरले. हृदयविकाराच्या उपचारासाठी ते मुंबईत आले होते. विमानतळावरील कन्वेयर बेल्टवरून आपली बॅग घेतल्यानंतर, बॅगेला लावलेले निळ्या रंगाचे लोखंडी कुलूप तोडण्यात आल्याचे आणि त्याच्या जागी दुसरी पितळी कुलूप लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

अरुणाचलमध्ये चीनचा नवा कब्जा नाही!

भारताच्या निर्यातीचा विक्रम! जुलैमध्ये ४४.२४ अब्ज डॉलरची झेप

टॅरिफ चुकवण्यासाठी चीनकडून भारताचा वापर? ४० देशांवर अमेरिकेचा आरोप

५ वर्षात महाराष्ट्रात ३६ हजार २११ कंपन्या बंद पडल्या?

चोराने प्रवाशांनी लावलेले कुलूप तोडून ऐवज लांबवला आणि त्यानंतर बॅगेला दुसरे नवीन कुलूप लावून चलाखी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि बॅगेची हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत असून, पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा