31 C
Mumbai
Sunday, August 30, 2026
घरविशेषमुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली

मुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली

८ जण जखमी, लोकल वाहतूक सुरळीत

Google News Follow

Related

मुंबईत म्हाडा आणि एमएमआरडीएच्या पाडकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. पाडकामाच्या तयारीदरम्यान एक क्रेन अचानक मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर (OHE) कोसळली. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुदैवाने ही दुर्घटना मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वे मार्गावर घडल्याने नियमित लोकल आणि प्रवासी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून निष्कासन आणि पाडकाम मोहीम सुरू करण्याची तयारी सुरू होती. प्रस्तावित कामासाठी पोक्लेन मशीनच्या साहाय्याने क्रेन बसवण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनचा तोल गेला. त्यानंतर क्रेन थेट मध्य रेल्वेच्या ओएचई वायरवर कोसळली. दुर्घटनेनंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेन हटवण्याबरोबरच नुकसान झालेल्या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी आणखी कोणी अडकले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांपैकी सहा जणांना लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, सायन येथे, तर दोघांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

  • रेयान खान (१८) — मुका मार.
  • अतिकूर रहिमान (६०) — मुका मार.
  • अभास सलीम खान (३०) — मुका मार.
  • हुकूम शेख (३६) — डोक्याला मार; सीटी स्कॅनसाठी नेण्यात आले.
  • नुमान खान (२१) — गुडघ्याला मार.
  • जगरूलला नोबी मोहम्मद खान (६३) — डाव्या पायाला मार.
  • सुरज याम (१०) — दोन्ही पायांना आणि खांद्याला दुखापत.
  • अकबर खान (३०) — जखमी.

सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमींच्या उपचारांसह त्यांच्या वैद्यकीय स्थितीवर रुग्णालय प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

९ पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर सावधान! २४ ऑगस्टपासून नवा नियम

“भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक”

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

दुःखात ‘देवाभाऊ’ बनले आधार, आज बहिणीच्या नव्या संसाराची बांधली गाठ

बाधित रेल्वे मार्गाचा वापर प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्याने मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, दुर्घटनाग्रस्त क्रेन हटवणे, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे आणि परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा