27 C
Mumbai
Monday, September 14, 2026
घरदेश दुनियाजॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

इराणच्या लाराक बेटावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई

Google News Follow

Related

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने इराणच्या लाराक बेटावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं इराणने म्हटलं आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या माहितीनुसार, किंग हुसेन आणि अल-अझराक या दोन अमेरिकी तळांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसोबत ड्रोनचाही वापर करण्यात आल्याचं इराणने म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराशी संबंधित तांत्रिक आणि देखभाल सुविधा, तसेच लढाऊ विमानांच्या तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, जॉर्डनच्या लष्कराने आपल्या हवाई हद्दीत घुसलेली आठ क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने पाडल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात दोन्ही अमेरिकी तळांवर कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आलेली नाही. त्यामुळे इराणने केलेल्या मोठ्या नुकसानीच्या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचा:

अंकित बालियान हत्या प्रकरणातील दोन शुटर्स एन्काऊंटरमध्ये ठार

फोनवर बोलताना भरधाव कारने आठ वर्षीय मुलाला चिरडलं

बटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला…

मैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!

इराणने हा हल्ला अमेरिकेच्या लाराक बेटावरील कारवाईचा थेट बदला असल्याचं म्हटलं आहे. रविवारी अमेरिकन सैन्याने लाराक बेटावरील इराणच्या दोन रॉकेट लॉन्चर्सना लक्ष्य केलं होतं. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची पथकं स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये समुद्री सुरुंग टाकण्यासाठी रॉकेट्स तयार करत होती. व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं अमेरिकेने सांगितलं. मात्र, इराणने अमेरिकी हल्ल्याचा निषेध करत या कारवाईत इराणी सैनिक आणि नागरिक ठार-जखमी झाल्याचा दावा केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा