31 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरविशेष२०० वर्षांनी घरात मुलगी झाली हो!

२०० वर्षांनी घरात मुलगी झाली हो!

चिमुकलीला रथातून आणत राजेशाही स्वागत

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील दहिफळे कुटुंबासाठी २०० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. तब्बल दोन शतकांनंतर त्यांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला आणि या चिमुकल्या लेकीच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चार पिढ्यांनंतर घरात मुलीचा जन्म झाल्याने तिचे स्वागत अगदी राजकन्येसारखे करण्यात आले. गार्गी असे या चिमुकलीचे नाव ठेवण्यात आले असून, रुग्णालयातून आईसोबत घरी आणताना कुटुंबीयांनी खास रथ सजवला होता. ढोल-ताशांचा गजर, नातेवाईकांचा जल्लोष आणि नृत्याच्या तालावर साजरा होणारा आनंद, अशा उत्साहपूर्ण वातावरणात गार्गीचे घरात आगमन झाले.

दहिफळे कुटुंबात अनेक वर्षांपासून मुलगी नसल्याची खंत होती. त्यामुळे गार्गीच्या जन्माची बातमी समजताच कुटुंबीयांचा आनंदाला पारावार उरला नाही. आजोबा लिंबाजी दहिफळे यांच्यासाठी तर हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. कुटुंबात मुलीचा जन्म व्हावा, ही अनेक वर्षांची इच्छा अखेर पूर्ण झाली. त्यामुळे गार्गीला रथातून घरी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तिच्या स्वागतासाठी नातेवाईकांनी मोठी तयारी केली आणि घराचा परिसर आनंदाच्या वातावरणाने भारून गेला.
हे ही वाचा:
तुर्कीच्या समुद्रात जहाजांच्या धडकेत एक जहाज बुडाले

एनआरआयच्या ठेवींमुळे भारताचा परकीय चलनसाठा मजबूत

तिलक वर्माचा धडाका! साऊथ झोन फायनलमध्ये

काश्मीरमध्ये बदलले चित्र! दगडफेकीत ९८.६%, दहशतवादी भरतीत ९९% घट

गार्गीच्या आजी सुरेखा दहिफळे यांनीही नातवंड म्हणून मुलीचे आगमन हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. घरात लक्ष्मी आली असून तिचे लाडाने संगोपन करण्याचा निर्धार कुटुंबीयांनी केला आहे. गार्गीच्या वडिलांनीही मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत, मुलगी ही घरासाठी आनंद आणि भाग्य घेऊन येते, अशी भावना व्यक्त केली. आपल्या लेकीला फुलासारखे जपून वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आजही अनेक ठिकाणी मुलगा-मुलगी असा भेद केला जात असताना दहिफळे कुटुंबाने मात्र आपल्या कृतीतून मुलीच्या जन्माचा किती मोठा आनंद साजरा करता येतो, हे दाखवून दिले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा