29 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरविशेषडीजेविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला

डीजेविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला

हल्ल्यानंतरही भूमिकेवर ठाम

Google News Follow

Related

पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी हल्ला झाला. टिळक रोड परिसरात ते माध्यमांशी संवाद साधत असताना एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ल्यानंतरही आपली भूमिका योग्य असून आपण त्यावर ठाम असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याला विद्यानंद बापट यांनी विरोध केला होता. उत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून, त्यातून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर टिळक रोड परिसरात बापट माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी एक तरुण अचानक त्यांच्या जवळ आला आणि त्याने बापट यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला रोखले. या संपूर्ण घटनेचे चित्रण कॅमेऱ्यात झाले आहे.

हे ही वाचा:

यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

कराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

हवाई दलाच्या स्वदेशी शस्त्रसामर्थ्यात ‘खगांतक-243’ची भर

भारत-इराण जवळीकतेने अमेरिकेला मुरडा

हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना विद्यानंद बापट यांनी संबंधित व्यक्तीने सवंग प्रसिद्धीसाठी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. आपण सशस्त्र नसल्याचे तसेच घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती नसल्याचे पाहून त्याने हल्ला केला असावा, असे बापट म्हणाले. “सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे. पोलिसांनी ते पाहून कारवाई करावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच सार्वजनिक उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हल्लेखोराला अटक

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून, तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तो राऊतवाडीतील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा