31.4 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरदेश दुनियाइराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिकेकडून हल्ल्याचा इशारा

इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिकेकडून हल्ल्याचा इशारा

दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

Google News Follow

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शमण्याची चिन्हे दिसत नसून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इराणच्या अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत असलेल्या ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिका लवकरच हल्ला करू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेचे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. पिकॅक्स माउंटन परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्यास अमेरिकेकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. पिकॅक्स माउंटन हे इराणच्या नतांझ युरेनियम संवर्धन केंद्राजवळ असून, हे ठिकाण अत्यंत मजबूत सुरक्षा व्यवस्थेसाठी ओळखले जाते. पर्वताच्या आत खोलवर बांधलेल्या बोगद्यांमध्ये या केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे हवाई हल्ल्यांपासून या ठिकाणाला नैसर्गिक संरक्षण मिळते. येथे दोन खोल भूमिगत बोगदा संकुले असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

चायना मास्टर्समध्ये श्रीकांतचा प्रवास संपला

एका तासाच्या मुसळधार पावसानंतर दिल्ली विमानतळ जलमय

स्वतंत्र भारद्वाजला बुलंदशहरातून अटक

अ‍ॅडोबच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती

अमेरिका आणि इराणमधील सध्याच्या संघर्षाला युद्ध म्हणण्यासही ट्रम्प यांनी टाळाटाळ केली. त्यांनी या संघर्षाचे वर्णन ‘मिलिटरी कॉन्फ्लिक्ट’ म्हणजेच लष्करी संघर्ष असे केले. हा संघर्ष अमेरिकेसाठी फार मोठा नसल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, इराण आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित उपकरणे आणि सेंट्रीफ्यूज सुरक्षित भूमिगत ठिकाणी हलवत असल्याच्या शक्यतेमुळे पिकॅक्स माउंटनकडे अमेरिकेचे विशेष लक्ष आहे. हे केंद्र भविष्यात इराणच्या अणुकार्यक्रमासाठी महत्त्वाचे ठरू शकते, अशी अमेरिकेची आणि इस्रायलची चिंता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा