31 C
Mumbai
Tuesday, September 8, 2026
घरक्राईमनामाजम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये लष्करच्या कमांडरचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये लष्करच्या कमांडरचा खात्मा

सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील योरसमार्ग परिसरात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाकिस्तानचा रहिवासी आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर यासिर ठार झाला. शनिवारी झालेल्या या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

माहितीनुसार, यासिर हा लष्कर-ए-तैयबाच्या मोठ्या सुलेमान मुसा गटाशी संबंधित होता. मात्र, सुमारे वर्षभरापूर्वी तो या गटापासून वेगळा झाला होता. त्यानंतर तो स्वतंत्रपणे कारवाया करत होता आणि योरसमर्ग परिसरात लष्करचा महत्त्वाचा कमांडर म्हणून सक्रिय झाला होता. सुरक्षा दल गेल्या काही काळापासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शनिवारी सुरक्षा दल आणि यासिर यांचा आमनासामना झाल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी यासिरला ठार केले.

योरसमर्गच्या जंगल परिसरात ही चकमक झाल्यानंतर सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात इतर दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेऊन लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे कारवाई करत आहेत.

हे ही वाचा:

खार्ग बेटाजवळ इराणी तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी ‘कॉक्रोच’चे गैरवर्तन

S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

दरम्यान, सुरक्षा यंत्रणा आता यासिरच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचे लष्कर-ए-तैयबाशी असलेले संबंध आणि जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता का, याचाही तपास करत आहेत. ही कारवाई जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा