29 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

धावपट्टी ओलांडून विमान वाहनांवर आदळले

Google News Follow

Related

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेझॉनच्या मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. लँडिंग करताना विमान धावपट्टी ओलांडून बाहेर गेले आणि विमानतळ परिसरातील अनेक वाहनांवर आदळले. त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेझॉन प्राइम एअरचे फ्लाइट ७५९८ हे बोईंग ७६७-३०० मालवाहू विमान पोर्तो रिकोतील सॅन जुआन येथून मियामीला आले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून पुढे गेले. त्यानंतर ते अनेक वाहनांवर आदळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुर्घटनेनंतर आकाशात दाट काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दृश्य समोर आले.

दुर्घटनेनंतर मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व धावपट्ट्या आणि टॅक्सीवे तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे विमानतळावर ‘ग्राउंड स्टॉप’ लागू करण्यात आला असून अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. नंतर काही धावपट्ट्यांवरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या, मात्र प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. अपघातानंतर मियामी-डेड फायर रेस्क्यूच्या ६० हून अधिक युनिट्स घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने विशेष फोम आणि विमानतळावरील अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट आणि सहवैमानिक अडकल्याची माहितीही समोर आली होती. तसेच, विमानाच्या धडकेमुळे काही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांचीही सुटका करण्यात आली.

हे ही वाचा:

नेपाळमधील जलप्रलयानंतर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला दणका

दिल्लीत ढिगाऱ्यात अडकलेल्या विद्यार्थ्याचा आपत्कालीन मदतीसाठीचा व्हिडिओ व्हायरल

इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत

भारताच्या ज्युनियर महिलांचा आशिया कप हॉकीत सलग दुसरा विजय

दरम्यान, हे विमान अमेझॉन एअरच्या ताफ्यातील असले तरी ते २१ एअर या कंपनीकडून ऑपरेट केले जात होते. अमेझॉनने दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत स्थानिक प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा