29 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरदेश दुनियामोदी-पुतिन यांची पुन्हा कार डिप्लोमसी; ‘फोर्ट्रेस ऑन व्हील्स’मधून प्रवास

मोदी-पुतिन यांची पुन्हा कार डिप्लोमसी; ‘फोर्ट्रेस ऑन व्हील्स’मधून प्रवास

ब्रिक्स परिषदेदरम्यानचा खास प्रवास चर्चेत

Google News Follow

भारत आणि रशिया या दोन देशांमधील संबंध दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून आता भारत आणि रशियाच्या मैत्रीची चर्चा केवळ बैठकीच्या टेबलापुरती मर्यादित राहिलेली नाही. ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पुन्हा एकदा एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासानंतर दोन्ही नेत्यांच्या ‘कार डिप्लोमसी’ची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मोदी आणि पुतिन यांची भारत मंडपम येथे द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेनंतर दोन्ही नेते पुन्हा एकाच गाडीतून रवाना झाले. पुतिन यांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी ‘ऑरस सेनाट’ ही विशेष गाडी यावेळीही चर्चेचा विषय ठरली. या गाडीला तिच्या उच्च सुरक्षाव्यवस्थेमुळे ‘फोर्ट्रेस ऑन व्हील्स’ म्हणजेच ‘चाकांवरील किल्ला’ असे म्हटले जाते. मोदी आणि पुतिन यांच्यात अशा प्रकारे एकाच गाडीतून प्रवास करण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी बिश्केक येथे झालेल्या भेटीदरम्यानही एकाच गाडीतून प्रवास केला होता. त्यामुळे या अनौपचारिक प्रवासाकडे दोन्ही देशांमधील वैयक्तिक विश्वास आणि जवळीक दाखवणारा संकेत म्हणून पाहिले जात आहे.

यापूर्वी २०२५ मध्येही मोदी आणि पुतिन यांनी एकत्र ऑरस सेनाटमधून प्रवास केला होता. त्या वेळीही पुतिन यांनी मोदींची गाडीत बसण्यासाठी प्रतीक्षा केली होती आणि दोन्ही नेत्यांचा हा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे आता दिल्लीतील हा प्रवास पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आला आहे.

हे ही वाचा:

मुक्त व्यापार, स्थानिक चलनांचा वापर

डीआरएसवरून ईशान-वैभवची जुगलबंदी

पेगुलाचा सरळ सेटमध्ये धुव्वा; सबालेंका यूएस ओपनच्या फायनलमध्ये!

‘स्पेशल २६’ स्टाईलने बनावट आयकर धाड घालणारे दोन इन्स्पेक्टर

भारत आणि रशियामधील संबंध सध्या बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहेत. युक्रेन युद्ध, रशियावर असलेले पाश्चिमात्य निर्बंध आणि भारताचे रशियासोबत सुरू असलेले ऊर्जा व संरक्षण सहकार्य या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची ठरते. अशा वेळी औपचारिक चर्चांसोबतच मोदी-पुतिन यांचा हा एकत्रित कारप्रवासही दोन्ही देशांतील संबंधांमधील अनौपचारिक जवळीक दाखवणारा ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा