28 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेषगणेशोत्सवात कोकणवारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तीन मेमू धावणार

गणेशोत्सवात कोकणवारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तीन मेमू धावणार

कोकण रेल्वेकडून मोठा दिलासा

Google News Follow

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांना कोकणाची ओढ लागते. गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्याची तयारी सुरू असताना अनेक प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासा दिला आहे. दिवा आणि पनवेलहून चिपळूण आणि खेडपर्यंत तीन अनारक्षित मेमू रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात या विशेष मेमू सेवांचा चाकरमान्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या गाड्यांसाठी आरक्षित तिकिटाची आवश्यकता नसल्याने कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना कोकण गाठण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दिवा-चिपळूण मेमू

  • ०११३३/३४ दिवा-चिपळूण मेमूची सेवा ११ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत एकूण १५ फेऱ्या करणार आहे.
  • ०११३३ ही गाडी दिवा येथून दुपारी १.४० वाजता सुटून रात्री ९.३० वाजता चिपळूणला पोहोचेल.
  • ०११३४ ही गाडी चिपळूण येथून सकाळी ७.३० वाजता सुटून दुपारी १ वाजता दिव्याला पोहोचेल.

दिवा-खेड मेमू

  • ०११५५/५६ दिवा-खेड मेमूची सेवा ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत १६ फेऱ्या करणार आहे.
  • ०११५५ ही गाडी दिवा येथून सकाळी ७.१५ वाजता सुटून दुपारी २.३५ वाजता खेडला पोहोचेल.
  • ०११५६ ही गाडी खेड येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि रात्री १०.५० वाजता दिव्याला पोहोचेल.

पनवेल-चिपळूण मेमू

  • ०११६०/५९ पनवेल-चिपळूण मेमूची सेवा १० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत १५ फेऱ्या करणार आहे.
  • ०११५९ ही गाडी पनवेल येथून दुपारी ३.२० वाजता सुटून रात्री १०.२० वाजता चिपळूणला पोहोचेल.
  • ०११६० ही गाडी चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटून दुपारी २.३० वाजता पनवेलला पोहोचेल.

हे ही वाचा:

‘ब्रिक्स’मध्ये प्रवेशासाठी पाकिस्तानची तीन वर्षांपासून धडपड

सहा वर्षांनंतर ग्वांगझोऊ-नवी दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार

मोदींचा ब्रिक्समधील ‘तो’ फोटो सांगतोय भारताची कूटनीती!

माजी लष्करी हवालदाराने चोरल्या चार AK-203 रायफल्ससह १,९०० काडतुसे

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा