28.9 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरराजकारणआंदोलन केले तर 'कॉक्रोच'ना दादरकर देणार दणका

आंदोलन केले तर ‘कॉक्रोच’ना दादरकर देणार दणका

Google News Follow

Related

एकीकडे देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध विरोधी पक्ष आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीनेही अशाच आंदोलनाची हाक दिली असून त्याची सुरुवात २ ऑक्टोबरला मुंबईत शिवाजी पार्कपासून होत असल्याची घोषणा केली आहे. मात्र शिवाजी पार्कमध्ये याच मुद्द्यावरून मंगळवारी राडा झाला. कॉक्रोच पार्टीने आंदोलन केले तर त्यांना दणका देण्याची भावना दादरकरांनी व्यक्त केली.

मंगळवारी शिवाजी पार्कमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांशी स्थानिक रहिवाशांची बाचाबाची झाली. त्यांनी इथे आंदोलन करू नये, असा इशारा स्थानिकांनी दिला. त्यावेळी या स्थानिक रहिवाशांशी कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी हिंदीत संवाद साधण्याचे ठरविल्यावर त्यांना मराठीत बोला, हा महाराष्ट्र आहे, असे स्थानिकांनी सुनावले.

हे ही वाचा:

भारताने अॅथलेटिक्समध्ये पटकावले पहिले सुवर्णपदक

भाजपच्या नव्या टीमला मोठी जबाबदारी

केतनच्या लग्नासाठी सिया गोयलला ८ लाखांचे कपडे, ८० लाखांचे दागिने

‘कॉक्रोच’ला पाठिंबा देत ठाकरे बंधूंची मोर्चाची घोषणा

एका स्थानिक रहिवाशाला मीडियाने विचारल्यावर इथे आंदोलन कशासाठी करत आहात. इथे सर्वसामान्य नागरिकांना वावरण्याचा अधिकार आहे की नाही. ज्येष्ठ नागरीक इथे शिवाजी पार्कमध्ये फिरण्यासाठी येत असतात, त्यांना शांततेत फिरू देणार की नाही? प्रत्येक जण येतो आणि शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करतो म्हणजे काय?

त्या रहिवाशाने सांगितले की, जर इथे आंदोलन केले गेले तर आम्ही ऐकून घेणार नाही. सध्या या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. पण जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पोलिसांना न्यायालयात खेचू.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा