28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरस्पोर्ट्सनेम धरला, सोने जिंकले; नीरू-किनानने भारताचा डंका वाजवला!

नेम धरला, सोने जिंकले; नीरू-किनानने भारताचा डंका वाजवला!

Google News Follow

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी करत आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. नीरू ढांडा आणि किनान चेनाई यांच्या जोडीने मिश्र ट्रॅप नेमबाजी प्रकारात अंतिम फेरीत ३४ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. कतारने ३२ गुणांसह रौप्यपदक, तर चीनने २३ गुणांसह कांस्यपदक पटकावले. इराणचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला.

नीरू ढांडा हिचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी तिने महिला ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक आणि वैयक्तिक ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली.

मिश्र ट्रॅपच्या अंतिम फेरीत नीरू आणि किनान यांनी सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी केली. पहिल्या मालिकेत त्यांनी सहा गुण मिळवले, तर दुसऱ्या मालिकेअखेर त्यांची गुणसंख्या १६ झाली. तिसऱ्या मालिकेपर्यंत भारतीय जोडीने २६ गुणांची कमाई केली. अखेरच्या मालिकेत आणखी आठ गुणांची भर घालत त्यांनी एकूण ३४ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले.

बुधवारी भारतीय खेळाडूंनी तिरंदाजी आणि नेमबाजीमध्ये सुवर्णपदके जिंकली. मिश्र कंपाउंड तिरंदाजीमध्ये राजेश जाधव आणि चिकिथा तानिपार्थी यांच्या जोडीने दक्षिण कोरियाचा शूट-ऑफमध्ये पराभव केला. निर्धारित फेऱ्यांनंतर दोन्ही संघांचा स्कोअर १५७-१५७ असा बरोबरीत होता. शूट-ऑफमध्ये भारतीय जोडीने बाजी मारली.

महिला कंपाउंड तिरंदाजी संघानेही चीनला २३८-२३४ असे नमवत सुवर्णपदक जिंकले. चिकिथा तानिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या त्रिकुटाने भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

या तीन सुवर्णपदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या सुवर्णपदकांची संख्या नऊवर पोहोचली. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे देशाच्या पदकतालिकेत आणखी भर पडली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा