27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सकोरियाचा गड भेदत भारताचा सुवर्णवेध!

कोरियाचा गड भेदत भारताचा सुवर्णवेध!

Google News Follow

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला रिकर्व तिरंदाजी संघाने ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात कुमकुम मोहोद, अंकिता भक्त आणि कीर्ती शर्मा यांच्या भारतीय संघाने बलाढ्य दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करत भारताला स्पर्धेतील ११वे सुवर्णपदक मिळवून दिले.

ओकाजाकी चुओ सोगो पार्क मल्टीपर्पस स्क्वेअर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच संयमी खेळ केला. पहिला सेट ५४-५४ असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र दबावाच्या क्षणी १७ वर्षीय कुमकुम मोहोदने अचूक निशाणा साधत १० गुणांचे महत्त्वपूर्ण शॉट्स लगावले.

तिसऱ्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी संधी साधत आघाडी मिळवली आणि सामना ४-२ असा आपल्या बाजूने झुकवला. चौथ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र अंकिता आणि कीर्तीच्या दमदार शॉट्सनंतर कुमकुमने अखेरच्या निर्णायक क्षणी पुन्हा १० गुणांचा अचूक वेध घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

१० वेळच्या विजेत्या कोरियाला धक्का

दक्षिण कोरिया महिला रिकर्व प्रकारात १० वेळा आशियाई चॅम्पियन ठरला आहे. अशा बलाढ्य संघाला पराभूत करत भारतीय महिला रिकर्व संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात या प्रकारातील पहिलेच सुवर्णपदक पटकावले.

भारताने उपांत्य फेरीत चीनचा ५-१ असा पराभव करत प्रथमच रिकर्व महिला संघाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात कोरियाला नमवत भारतीय तिरंदाजांनी सुवर्ण इतिहास रचला.

कुमकुम मोहोद, अंकिता भक्त आणि कीर्ती शर्मा यांच्या अचूक निशाण्याने भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा