29 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरबिजनेसमुंबईत नऊ महिन्यांत ७२,८०४ घरांची विक्री

मुंबईत नऊ महिन्यांत ७२,८०४ घरांची विक्री

२०१८ नंतर उच्चांकी

Google News Follow

Related

मुंबईतील निवासी बाजारपेठेत यंदाच्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ७२,८०४ घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत १ टक्क्याची वाढ झाली असून, २०१८ नंतरचा हा या कालावधीतील सर्वाधिक आकडा आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

या कालावधीत मुंबईत विकासकांनी ७२,६७३ नवीन निवासी युनिट्स बाजारात आणल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्या घरांच्या लॉन्चिंगमध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे नवीन पुरवठा आणि घरांच्या मागणीमध्ये जवळपास समतोल राहिला. देशातील आठ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये मुंबईचा दबदबा कायम राहिला. जानेवारी-सप्टेंबरदरम्यान देशात विक्री झालेल्या एकूण २,५८,२३८ घरांपैकी २८ टक्के घरे मुंबईतील होती. याच कालावधीत देशभरात लॉन्च झालेल्या २,७९,८९९ नवीन युनिट्सपैकी मुंबईचा वाटा २६ टक्के राहिला.

मुंबईत वर्षभर तिमाही आधारावर घरांच्या विक्रीत वाढ दिसून आली. पहिल्या तिमाहीतील २३,१८५ युनिट्सची विक्री तिसऱ्या तिमाहीत २५,४४९ युनिट्सवर पोहोचली. २०१८ नंतर एखाद्या तिमाहीत झालेली ही मुंबईतील सर्वाधिक विक्री आहे. दरम्यान, घरांच्या किमतीनुसार मागणीत बदल दिसून येत आहे. ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ६ टक्क्यांनी घटून २६,१३६ युनिट्स झाली. ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांची विक्रीही १ टक्क्याने घटून १७,६०१ युनिट्सवर आली. मात्र, १ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली.

१ ते २ कोटी रुपयांच्या घरांची विक्री ९ टक्क्यांनी वाढून १६,२९६ युनिट्स, तर २ ते ५ कोटी रुपयांच्या घरांची विक्री ११ टक्क्यांनी वाढून ९,८६१ युनिट्स झाली. ५ ते १० कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीत १६ टक्के वाढ झाली. १० ते २० कोटी आणि २० ते ५० कोटी रुपयांच्या घरांच्या व्यवहारात अनुक्रमे ४० टक्के आणि ३५ टक्के वाढ नोंदवली गेली.

हे ही वाचा:

१५ वर्षांत १०० अब्ज डॉलर गुंतवणूक, १० लाख रोजगार

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री मान यांच्या सहाय्यकाची सीबीआय चौकशी

रशियात ‘प्लेग’ची भीती? लॅब संशोधकाच्या मृत्यूनंतर २०० जण क्वारंटाइन

भारत संकटात असताना रशिया पाठीशी!

मुंबईतील भारित सरासरी निवासी किंमत तिसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून ३७,०६४ रुपये प्रति चौरस फूट झाली. तसेच, न विकलेल्या घरांचा साठा २ टक्क्यांनी घटून सुमारे १,५५,४७३ युनिट्सवर आला. विक्रीचा वेग वाढल्याने हा साठा संपवण्यासाठी लागणारा अंदाजित कालावधीही ६.६ तिमाहींवरून ६.४ तिमाहींवर आला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा