29.3 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरस्पोर्ट्सहरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद

हरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद

Google News Follow

Related

भारतीय महिला क्रिकेटला वनडे विश्वचषक २०२५चे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील भारतीय महिला संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत हरमनप्रीतने ही घोषणा केली. मात्र, खेळाडू म्हणून तिचा क्रिकेटमधील प्रवास सुरूच राहणार आहे.

हरमनप्रीतने उपकर्णधार स्मृती मंधाना, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या जागी तिन्ही प्रकारांसाठी स्मृती मंधाना हिच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

हरमनप्रीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. या प्रवासात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर सोबत राहणारे असंख्य क्षण आहेत.”

कर्णधार म्हणून अनेक कठीण निर्णय घेताना संघाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे तिने सांगितले. अनेकदा स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाच्या हिताला महत्त्व दिले. “माझ्या प्रत्येक निर्णयामागे संघाला अधिक चांगले बनवणे आणि प्रत्येक खेळाडूला स्वतःवर विश्वास ठेवून सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी देणे, हा उद्देश होता,” असे हरमनप्रीतने नमूद केले.

तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने मोठी मजल मारली. २०२५ मध्ये भारताने पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकत इतिहास घडवला. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके आणि २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्यातही हरमनप्रीतच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका राहिली.

‘कर्णधारपद संपले, पण प्रवास सुरूच’

आपल्या निर्णयाबाबत हरमनप्रीतने स्पष्ट केले की, कर्णधारपदाची जबाबदारी संपली असली तरी भारतीय क्रिकेटशी असलेले नाते कायम राहणार आहे.

“कर्णधारपद आज संपले असेल, पण भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीच संपणार नाही. आता पुन्हा खेळावरील प्रेमासाठी खेळण्याची वेळ आली आहे. कर्णधारपद संपले, पण प्रवास सुरूच आहे,” असे भावनिक उद्गार तिने काढले.

कर्णधार म्हणून कामगिरी

३७ वर्षांच्या हरमनप्रीतने २०१६पासून पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली. तिने भारताचे नेतृत्व ५ कसोटी, ५१ वनडे आणि १५५ टी-२० सामन्यांत केले. तिच्या नेतृत्वातील सर्वात मोठा क्षण म्हणजे २०२५चा वनडे विश्वचषक विजय.

हरमनप्रीतच्या कर्णधारपदाच्या पर्वाला आता पूर्णविराम मिळाला असला, तरी भारतीय महिला क्रिकेटच्या मैदानावर तिची बॅट अजूनही दिसणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा