29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये सातवीतील मुलाच्या मानेवर सुईसदृश वस्तू टोचली

घाटकोपरमध्ये सातवीतील मुलाच्या मानेवर सुईसदृश वस्तू टोचली

चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

मालाडच्या कुरार परिसरात ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाला काही मुलांनी मारहाण करून त्याच्या मानेवर इंजेक्शन दिल्यासारखी वस्तू टोचल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर मुलाला भोवळ येऊन तो बेशुद्ध पडला. प्रेमनगर येथील मैदानात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलाला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात हा १३ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहतो. सोमवारी दुपारी तो आपल्या चुलत भावासोबत प्रेमनगर येथील मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी काही मुलांनी दोघांनाही मारहाण केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. मारहाण सुरू झाल्यानंतर त्याचा चुलत भाऊ तेथून पळून गेला. काही वेळाने स्थानिकांना हा मुलगा मैदानात बेशुद्धावस्थेत आढळून आला.

स्थानिकांनी त्याला तातडीने घाटकोपर येथील मुक्ताबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत कळवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात येऊन चौकशी केली नसल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी केला आहे.

मुलगा शुद्धीवर नसल्याने त्याचा जबाब तातडीने नोंदवता आला नाही. मंगळवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. तीन ते चार मुलांनी आपल्याला मारहाण केली. त्यानंतर मानेवर इंजेक्शन दिल्यासारखे काहीतरी टोचले आणि त्यानंतर भोवळ येऊन आपण बेशुद्ध झालो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

मुंबई सेंट्रल मंडळात स्वच्छता पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान

ते वगळलेले १३ कोटी मतदार…मृत, पत्ते बदललेले, दुबार नोंदी असलेले!

मात्र, मुलाने सांगितलेल्या घटनेबाबत पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता वेगळी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी तसेच परिसरातील अनेक नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली नसल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मुलाच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. मुलाने सांगितलेल्या घटनेची सत्यता आणि त्याला नेमके काय टोचण्यात आले होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे, अशी माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा