28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सपेनल्टीवर अखेरची मोहोर; मेस्सीचा भावुक अलविदा!

पेनल्टीवर अखेरची मोहोर; मेस्सीचा भावुक अलविदा!

अर्जेंटिनाच्या जर्सीतील मेसीचा अखेरचा जलवा

Google News Follow

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी याचा राष्ट्रीय संघाच्या जर्सीतील अखेरचा सामना भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. ब्यूनस आयर्स येथील एस्टाडियो मास मोनुमेंटल मैदानावर बेनिनविरुद्ध झालेल्या फेअरवेल सामन्यात मेसीने एक गोल आणि दोन असिस्ट करत आपल्या कारकिर्दीला दिमाखदार निरोप दिला.

मेसीला अर्जेंटिनाच्या जर्सीत शेवटच्यांदा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सामना सुरू होण्यापूर्वी रिव्हर प्लेटच्या अध्यक्षांनी मेसीचा विशेष सन्मान केला. त्याला क्लबची मानद सदस्यता, स्मृतिफलक आणि विशेष जर्सी प्रदान करण्यात आली. बेनिनच्या संघानेही मेसीला खास भेट देत त्याचा गौरव केला.

सामन्याच्या १०व्या मिनिटाला मेसीच्या सन्मानार्थ सामना थांबवून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बेनिनच्या खेळाडूंनीही मेसीशी हस्तांदोलन करत त्याला मानवंदना दिली. मेसीच्या या फेअरवेल सामन्याला ‘द लास्ट टँगो’ असे नाव देण्यात आले होते.

सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये मेसीने निकोलस ओटामेंडीला गोलसाठी असिस्ट करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६१व्या मिनिटाला निको पाझने दुसरा गोल करत अर्जेंटिनाची आघाडी वाढवली.

मात्र, चाहत्यांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण ७१व्या मिनिटाला आला. मेसीने पेनल्टीवर अप्रतिम फिनिश करत अर्जेंटिनासाठी तिसरा गोल केला. त्याचा अचूक शॉट थेट टॉप-राइट कॉर्नरमध्ये जाऊन विसावला. अर्जेंटिनाने अखेर सामना ३-० असा जिंकला.

अर्जेंटिनासाठी मेसीची अविश्वसनीय कारकीर्द

मेसीने अर्जेंटिनासाठी तब्बल २०८ सामने खेळले. या काळात त्याने १२६ गोल आणि ६९ असिस्ट नोंदवले. अखेरच्या सामन्यानंतर मेसीसह अर्जेंटिनाचे खेळाडू आणि हजारो चाहते भावुक झाले.

मेसीने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने त्याच्यासाठी अखेरचा फेअरवेल सामना आयोजित करण्याची विनंती केली होती. या सामन्याने अर्जेंटिनाच्या जर्सीतील मेसीच्या ऐतिहासिक प्रवासाला भावनिक पूर्णविराम मिळाला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा