32 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरक्राईमनामाआंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले

आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले

गुरुग्राममधील घरातून कारवाई

Google News Follow

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनापूर्वी यूट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. गुरुग्राममधील निवासस्थानातून पोलिसांनी ध्रुव राठीला ताब्यात घेतले आहे. शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्ली पोलिसांचे पथक गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील केंद्रीय विहार परिसरातील त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर राठी याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्या आईही घरी उपस्थित होत्या. पोलिसांच्या पथकात सुमारे ५० कर्मचारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवर (SIR) प्रश्न उपस्थित करत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या आरोपांना विरोध केला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जंतरमंतर परिसरासह राजधानीतील प्रमुख प्रवेशमार्गांवर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील निर्बंध, रेल्वेगाड्या रद्द करणे आणि काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यासारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

भारतावर शुल्क लादणारे ट्रम्प आता डिझेलसाठी पुतीन यांच्या दारी

अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निर्णयावर भारताचा स्पष्ट इशारा

एसआयआर मुद्द्यावरून इंडिया आघाडीत मतभेद?

मुस्लिमही काँग्रेसला मते देईनात…गौरव गोगोई राजीनामा द्या!

ध्रुव राठी याने आंदोलनापूर्वी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याने राजधानीत जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला होता आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे एसआयआरविरोधात झालेल्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता. दरम्यान, आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा