36 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरक्राईमनामादीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात

दीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात

जंतर-मंतर आंदोलनापूर्वी कारवाई

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नियोजित आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपकेसह आशुतोष रांका, सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी एअर इंडियाचे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर काही मिनिटांतच दिल्ली पोलिसांचे जवान विमानात दाखल झाले आणि त्यांनी दीपकेसह त्याच्या टीमला ताब्यात घेतले.

जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी आधीच कारवाई सुरू केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्याच्या उद्देशाने दीपकेसह त्याचे साथीदार मुंबईहून दिल्लीला विमानाने आले होते. त्यांना विमानातच ताब्यात घेण्यात आले. या दरम्यान, दीपके असे म्हणताना ऐकू येत आहे की, “मी फक्त अटक होण्यासाठीच आलो आहे. मला अटक करा.” आपण अटकेसाठी तयार असल्याचे सांगत त्याने, “मैं किसी से डरता नहीं हूँ,” असे म्हटले.

यापूर्वी यूट्यूबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी गुरुग्राममधील निवासस्थानातून ताब्यात घेतले. ध्रुव राठी याने आंदोलनापूर्वी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याने राजधानीत जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला होता आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे एसआयआरविरोधात झालेल्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता.

हे ही वाचा:

आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले

भारतावर शुल्क लादणारे ट्रम्प आता डिझेलसाठी पुतीन यांच्या दारी

अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निर्णयावर भारताचा स्पष्ट इशारा

एसआयआर मुद्द्यावरून इंडिया आघाडीत मतभेद?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जंतरमंतर परिसरासह राजधानीतील प्रमुख प्रवेशमार्गांवर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील निर्बंध, रेल्वेगाड्या रद्द करणे आणि काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यासारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा