28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरस्पोर्ट्सइम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवा!

इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवा!

रहाणेचा आयपीएलला सल्ला

Google News Follow

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा नियम आयपीएलमधून हटवण्यात यावा, अशी मागणी त्याने केली आहे. या नियमामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या विकासाला अडथळा निर्माण होत असून, त्याचा खेळाच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचे मत रहाणेने व्यक्त केले.

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे नेतृत्व केलेल्या रहाणेने ‘क्रिकबझ’शी बोलताना या नियमाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या वर्षी आयपीएलमधील कर्णधारांच्या बैठकीपूर्वी बहुतांश कर्णधारांनी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाला विरोध दर्शवला होता, अशी आठवणही त्याने करून दिली.
अष्टपैलू खेळाडूंच्या विकासाला खीळ

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमानुसार संघाला सामन्यादरम्यान एका खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवण्याची संधी मिळते. या सुविधेमुळे संघ फलंदाजाच्या जागी गोलंदाज किंवा गोलंदाजाच्या जागी फलंदाज आणून परिस्थितीनुसार आपली ताकद वाढवू शकतात. मात्र, याच कारणामुळे अष्टपैलू खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत योगदान देण्याची संधी कमी मिळत असल्याचे रहाणेचे म्हणणे आहे.

भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून अष्टपैलू खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः वेगवान गोलंदाजीसह फलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंची कमतरता भारतीय क्रिकेटमध्ये जाणवत आहे. हार्दिक पंड्याला पर्याय शोधताना भारतीय संघाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. शिवम दुबे आणि नितीश रेड्डी यांच्यासारखे खेळाडू पुढे आले असले, तरी हार्दिकच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी प्रगती करावी लागणार आहे.
९० धावांत ७ विकेट्स गमावूनही २०० धावांचा टप्पा!

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे सामन्यांचे स्वरूपही बदलत असल्याचे रहाणेने निदर्शनास आणले. काही संघांनी ९० धावांत ७ किंवा १०० धावांत ७ विकेट्स गमावल्यानंतरही अतिरिक्त फलंदाजाला मैदानात उतरवून धावसंख्या २०० धावांपर्यंत नेल्याची उदाहरणे त्याने दिली.

या नियमामुळे फलंदाजांना अतिरिक्त संधी मिळते; मात्र गोलंदाजांवर अधिक दबाव निर्माण होतो. त्यामुळे गोलंदाजांना काही प्रमाणात फायदा मिळणे आणि अष्टपैलू खेळाडूंना फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे रहाणेने स्पष्ट केले.

नियम हटवण्याची मागणी
‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा कोणताही ठोस फायदा दिसत नसल्याचे सांगत रहाणेने तो रद्द करण्याची भूमिका मांडली. या नियमासंदर्भातील विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे २०२७ पर्यंत लागू असल्याचे त्याने नमूद केले. त्यामुळे हा नियम यंदाच हटवला जाणार की पुढील मोठ्या लिलावाच्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाणार, हे स्पष्ट नसल्याचेही त्याने सांगितले.
आयपीएलमध्ये तात्कालिक कामगिरी सुधारण्यापेक्षा भारतीय क्रिकेटसाठी भविष्यातील अष्टपैलू खेळाडू घडवण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाच्या भवितव्याबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा