36 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरराजकारणसुटका होताच दिपकेची चीडचीड

सुटका होताच दिपकेची चीडचीड

पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका

Google News Follow

Related

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याची सशर्त सुटका झाल्यानंतर त्याची चीडचीड पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत त्याने टीका केली. सुटकेनंतर केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये दिपके म्हणाला. “पंतप्रधान म्हणून मोदी भारतासाठी लज्जास्पद आहेत. या देशाने यापूर्वी इतका मोठा भित्रा आणि दादागिरी करणारा नेता कधीच पाहिला नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिपके याच्यासह कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीला पोहोचले होते. मात्र, शनिवारी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी या तिघांना विमानातच ताब्यात घेतले. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत. याच मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतर येथे होणार होते. पण त्याआधीच पोलिसांनी सगळ्यांची धरपकड केली. दिपकेसह त्याच्या तिन्ही सहकाऱ्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले. आज दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

हे ही वाचा:
वर्षभर शांतता भंग करू नका, या अटीवर दिपकेसह तिघांची सुटका

सौदीच्या रियाध विमानतळावर हुतींनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १२ ठार

बदलत्या परिस्थितीनुसार भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप

एलॉन मस्क यांचा मुकेश अंबानींवर पुन्हा निशाणा

ताब्यात घेतल्यानंतर सुमारे २४ तासांनी दिल्लीतील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी या तिघांची सशर्त सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन भरण्याची आणि पुढील एक वर्ष शांततेचा भंग न करण्याची अट घालण्यात आली.

दरम्यान, दिपके याच्या टीकेवर भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या ट्विटच्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे. एसआयआर प्रक्रियेवरून आणि ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यावरून दिपके आणि सहकारी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा