28.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषरामलीलामध्ये रावण-कुंभकर्णासोबत ३० फुटांच्या ‘कॉकरोच’चेही दहन

रामलीलामध्ये रावण-कुंभकर्णासोबत ३० फुटांच्या ‘कॉकरोच’चेही दहन

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी उपक्रम

Google News Follow

दिल्लीतील रामलीलामध्ये यंदा रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. पीतमपुरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या रामलीलेतून स्वच्छतेचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. मात्र, राजधानीत कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या अनोख्या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे.

पीतमपुरा येथील वार्षिक रामलीलाचे आयोजन करणाऱ्या श्री केशव रामलीला समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीच्या मते, झुरळ हे घाण आणि अस्वच्छतेचे प्रतीक असून, त्याच्या पुतळ्याचे दहन केल्याने स्वच्छतेविषयी जनजागृती होईल. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ दिल्ली अभियानाचा भाग असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

समितीचे अध्यक्ष आणि भाजप आमदार अशोक गोयल यांनी या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगितले. रावणाच्या सैन्यातील असुरांच्या प्रतीकात्मक मांडणीत झुरळाचाही समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून वाईटावर चांगल्याचा विजय हा रामलीलेचा पारंपरिक संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनांमुळेही या निर्णयाकडे लक्ष वेधले गेले आहे. या संघटनेची स्थापना एका व्यंगात्मक निषेध चळवळीतून झाली. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याच्या वक्तव्यावरून ऑनलाइन तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर, या संघटनेने झुरळाला असंतोषाचे प्रतीक बनवले. बेरोजगारी, परीक्षांमधील कथित अनियमितता आणि सरकारी उत्तरदायित्व या मुद्द्यांवर संघटनेने आंदोलनांचा मार्ग स्वीकारला.

हे ही वाचा:

निखिल वागळे, संजय राऊतविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

टीम इंडियाच्या फलंदाजांना गावस्करांचा सज्जड दम

८५ पदकांच्या शिलेदारांचा मोदींकडून गौरव!

जळगावातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

अलीकडेच सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची हाक दिली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्तपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा घेऊन एकत्र येण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा