28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरक्राईमनामाअमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याची २ वर्षांपासून आखत होता योजना

अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याची २ वर्षांपासून आखत होता योजना

भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण जाहीरनामा; १९ वर्षीय तरुणाला अटक

Google News Follow

अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील अरोरा येथे हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार करण्याची योजना उधळून लावण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिस हा ही योजना आखत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या दाव्यानुसार, आरोपीने सामूहिक हत्या करण्याची तयारी केली होती. त्याने स्वतःला श्वेतवर्णीय वर्चस्ववादी आणि निओ-नाझी विचारसरणीचा समर्थक म्हटल्याचेही न्यायालयीन कागदपत्रांत नमूद आहे.

पापोराकिस हा शिकागोजवळील पॅलेटाइन येथे राहत होता आणि टॅको बेलमध्ये काम करत होता. तपासादरम्यान त्याच्याशी संबंधित ८ पानांचा जाहीरनामा आढळला. त्यात भारतीयांसह बिगरश्वेत लोकांविरोधात द्वेषपूर्ण विधाने आणि अनेकांना ठार मारण्याच्या कथित योजनेचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. गेल्या २ महिन्यांपासून तो अरोरा परिसरातील हिंदू धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप आहे.

११ ऑक्टोबर रोजी आरोपीने एआर-शैलीतील रायफलमधून एका व्यक्तीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; मात्र रायफल जाम झाल्याने गोळीबार होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने सहकाऱ्यांना रायफल दुरुस्त करून पुन्हा प्रयत्न करण्याबाबत संदेश पाठवल्याचा आरोप आहे. त्याच्या वागण्याबाबत दोन सहकाऱ्यांनी आपत्कालीन सेवांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपीच्या घरातून रायफल, अनेक भरलेली मॅगझिन, सुमारे ३०० काडतुसे, टॅक्टिकल जॅकेट आणि नाझी विचारसरणीशी संबंधित चिन्हे जप्त करण्यात आली. अरोरा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिर संभाव्य लक्ष्य असल्याचा संशय आहे; मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे ही वाचा:

रामलीलामध्ये रावण-कुंभकर्णासोबत ३० फुटांच्या ‘कॉकरोच’चेही दहन

निखिल वागळे, संजय राऊतविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

टीम इंडियाच्या फलंदाजांना गावस्करांचा सज्जड दम

८५ पदकांच्या शिलेदारांचा मोदींकडून गौरव!

अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत एफबीआयकडून द्वेषप्रेरित गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करण्याची मागणी केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही कथित हिंदूविरोधी आणि वंशवादी स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पापोराकिसला जामीन नाकारण्यात आला असून, त्याच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा