29.2 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषहवेत उडी, गिरकी आणि लँडिंग! टेस्लाची ‘रोडस्टर’ चर्चेत

हवेत उडी, गिरकी आणि लँडिंग! टेस्लाची ‘रोडस्टर’ चर्चेत

२०२८ मध्ये उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य

Google News Follow

जगातील इलेक्ट्रिक कार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आता स्पोर्ट्स कारच्या संकल्पनेलाच नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. टेस्लाची आगामी ‘रोडस्टर’ कार हवेत झेप घेण्यासोबतच हवेत गिरकी मारून पुन्हा जमिनीवर उतरू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टेक्सास येथे आयोजित कार्यक्रमात या कारची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित थ्रस्टर्सच्या मदतीने कारला हवेत उडी घेता येते, तसेच ती हवेत फिरून सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकते, असे या प्रात्यक्षिकांतून दाखवण्यात आले.

रॉकेट थ्रस्टर्समुळे कार हवेत झेपावणार

या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात वापरण्यात येणारे थ्रस्टर्स. टेस्लाच्या सर्वोच्च ‘रॉकेट’ व्हेरिएंटमध्ये १० थ्रस्टर्स असतील. हे थ्रस्टर्स उच्च दाबाने साठवलेल्या वायूचा वापर करून कारला हवेत झेप घेण्यास आणि हवेत असताना दिशा बदलण्यास मदत करतील. या तंत्रज्ञानाच्या विकासात एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीशी संबंधित एरोस्पेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

प्रात्यक्षिकादरम्यान कारने एका उंच वक्राकार रॅम्पवरून झेप घेतली. हवेत गिरकी मारल्यानंतर ती पुन्हा जमिनीवर उतरली. एका मोठ्या ट्रकसह इतर वाहनांच्या वरून उडी मारतानाचे दृश्यही दाखवण्यात आले. मात्र, ही प्रात्यक्षिके प्रत्यक्ष ग्राहकांना मिळणाऱ्या कारमध्ये याच क्षमतेने उपलब्ध होतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

० ते १०० किमीचा वेग ०.८१ सेकंदांत?

टेस्लाच्या दाव्यानुसार, रोडस्टर अवघ्या ०.८१ सेकंदांत ताशी १०० किलोमीटरचा वेग गाठू शकते. हा दावा प्रत्यक्ष उत्पादन मॉडेलमध्ये कितपत साध्य होतो, हे अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाही. कंपनी या कारच्या तीन आवृत्त्या सादर करण्याच्या तयारीत आहे. ‘परफॉर्मन्स’ व्हेरिएंटमध्ये रॉकेट थ्रस्टर्स नसतील. ‘थ्रस्ट’ आवृत्तीत मागील बाजूस प्रवेग वाढवण्यासाठी थ्रस्टर्स असतील, तर ‘रॉकेट’ आवृत्तीत १० थ्रस्टर्ससह हवेत झेप घेण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा असेल. रॉकेट आवृत्ती केवळ कंपनीच्या निमंत्रणावर निवडक ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याची २ वर्षांपासून आखत होता योजना

रामलीलामध्ये रावण-कुंभकर्णासोबत ३० फुटांच्या ‘कॉकरोच’चेही दहन

निखिल वागळे, संजय राऊतविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

टीम इंडियाच्या फलंदाजांना गावस्करांचा सज्जड दम

२०२८ मध्ये उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य

टेस्लाने रोडस्टरचे उत्पादन २०२८ मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कारची पुढील पिढी २०१७ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. त्यावेळी २०२० पासून डिलिव्हरी सुरू करण्याचे नियोजन होते; मात्र प्रकल्पाला अनेकदा विलंब झाला. नव्या रोडस्टरची अंतिम वैशिष्ट्ये, ग्राहकांना प्रत्यक्ष डिलिव्हरी कधी मिळणार आणि हवेत झेप घेण्याच्या क्षमतेला सार्वजनिक रस्त्यांवर कायदेशीर मान्यता मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे टेस्लाच्या या महत्त्वाकांक्षी कारकडे भविष्यातील इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानातील एक अनोखा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा