29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषरेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू

रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू

माहूर घाटात भीषण अपघात

Google News Follow

नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. माहूर घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यवतमाळ येथील एका फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार गुरुवारी रात्री मॅक्सिमो जितो टेम्पोने माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. रात्री बाराच्या सुमारास माहूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी यवतमाळच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडला. त्याचवेळी समोरून आलेल्या वाहनामुळे टेम्पो बाजूला घेण्याचा प्रयत्न करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दरीत कोसळले. या ठिकाणी संरक्षक कठडा किंवा मजबूत संरक्षक भिंत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
शत्रूला एकदा माफ करा, मित्राला दोनदा, देशद्रोह्याला कधीच नाही

तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांनी दिपकेची गठडी वळली

केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना ईडीचे समन्स

पुण्यातील पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात
या दुर्घटनेत राहुल ठाकरे आणि प्रीतम प्रधान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या बाबाराव टेकाम यांचा माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दत्तू मेश्राम, प्रतीक आडके आणि यशवंत पाटील हे अन्य तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न करावे लागले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त टेम्पो बाहेर काढण्यात आला. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबवण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावर देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. अशा वेळी घाटरस्त्यावरील धोकादायक वळणे आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाटातील अशा ठिकाणी संरक्षक कठडे, मजबूत भिंती, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या प्रवासासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना असणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी घाटरस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा