29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामाध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट

ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट

२०१८ मधील व्हिडिओ प्रकरण

Google News Follow

यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणी वाढल्या आहेत. २०१८ मधील कथित मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप आयटी सेलशी संबंधित व्हिडिओवरून हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात विकास संकृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी राठीविरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

ध्रुव राठीने २०१८ मध्ये ‘BJP IT Cell Part-2’ या शीर्षकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याविषयी बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचा दावा विकास पांडे यांनी केला आहे. भाजपच्या आयटी सेलवर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप मागे घेण्यासाठी आपल्यामार्फत एका व्यक्तीला ५० लाख रुपये देण्याची ऑफर देण्यात आल्याचा दावा व्हिडिओमध्ये केल्याचे पांडे यांचे म्हणणे आहे. या आरोपांमुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

हे ही वाचा:

अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर बस उलटून आठ जणांचा मृत्यू

‘जागा सोडून जा’ म्हणत मालवणीत हिंदूंवर हल्ला

दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीही ध्रुव राठीला समन्स बजावले होते. मात्र, अनेक वर्षांपासून समन्स बजावण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यात अडचणी येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राठी सामान्यतः ऑस्ट्रियात राहतो; मात्र सध्या तो भारतात असल्याचे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर गुरुग्राम येथील पत्त्यावर नव्याने समन्स बजावण्याचे निर्देश देण्यात आले. समन्स बजावण्याच्या प्रक्रियेत अडथळे आल्यानंतर आता न्यायालयाने राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा