29.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरक्राईमनामा१३ सराईत गुन्हेगार मुंबईतून दोन वर्षांसाठी हद्दपार

१३ सराईत गुन्हेगार मुंबईतून दोन वर्षांसाठी हद्दपार

Google News Follow

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे. उत्तर परिमंडळ-३ अंतर्गत दहिसर, समतानगर, कुरार, दिंडोशी आणि वनराई पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या तब्बल १३ सराईत गुन्हेगारांना मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उपनगरातील समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.

परिमंडळ-३ मधील विविध भागांत नागरिकांना व व्यावसायिकांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावणे, खंडणी, जबरी चोऱ्या, मारहाण, हप्तेवसुली तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईतांचा पोलिसांनी सखोल आढावा घेतला होता. या गुन्हेगारांच्या सातत्यपूर्ण दहशतीमुळे स्थानिक रहिवासी आणि व्यापारी वर्ग भयभीत झाला होता; अनेक जण भीतीपोटी तक्रार देण्यासही पुढे येत नव्हते.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-३ यांनी कठोर पावले उचलत संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत हद्दपारीचे प्रस्ताव मागवले. कायदेशीर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार १३ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार 

* अंमली पदार्थ विक्री व शरीरविषयक गुन्हे* (कलम ५६): नईम शहाबुद्दीन धोबी (वय ३०, वनराई), सुभाष मोतीलाल पटेल (वय ४१, कुरार), योगेश बाबुराव वाघमारे (वय ३०, समतानगर), सुरेश विजय माला उर्फ नेपल्या (वय ३५, दहिसर).

हे ही वाचा:

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी डीएमकेशी जवळीक?

भीक मागण्यासाठी सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण:१२तासांत सुखरूप सुटका

शांतता राखणार म्हणत दिपकेने सुटकेपूर्वी भरला बॉण्ड

दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देणारे ‘मिट्टी कॅफे’

* गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी (कलम ५६):*
अजय दिनेश द्विवेदी (वय ३४, वनराई), धीरज विजय गोरगावकर (वय ३४, दिंडोशी), जतीन बबन जावळे उर्फ जेत्या (वय २५, समतानगर), जयप्रकाश पुदियापुरावेल उर्फ बाबू (वय २९, समतानगर), दीपांशू जयशंकर सिंग (वय २७, समतानगर), आशिष विनोद यादव (वय २९, दहिसर), कुशल सुभाष दुबे (वय २०, दहिसर).

  1. कलम ५७ अंतर्गत कारवाई:

आयुब सरवरअली अन्सारी (वय २६, दहिसर) आणि महेश अमरसिंग चौहान उर्फ भांज्या (वय३५, दहिसर).
सर्व संबंधितांना हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत. हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांनी मुंबई शहर किंवा उपनगरात बेकायदेशीर प्रवेश केल्यास त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. परिसरात असा कोणताही हद्दपार इसम फिरताना आढळल्यास नागरिकांनी १०० किंवा ११२ या क्रमांकावर पोलिसांना तातडीने माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा