28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरराजकारणभारतातून पळाल्यावर ध्रूव राठीचे लंडनमध्ये आंदोलन

भारतातून पळाल्यावर ध्रूव राठीचे लंडनमध्ये आंदोलन

Google News Follow

यूट्यूबर ध्रुव राठी हा जंतर मंतर येथे १० ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीने जाहीर केलेल्या आंदोलनासाठी आला होता. मात्र त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता तो भारत सोडून लंडनमध्ये गेला आहे. आपण भारतात आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलोच नव्हतो असे म्हणणाऱ्या ध्रूव राठीने लंडनमध्ये मात्र भारतातील निवडणूक प्रक्रियेविरोधात आंदोलन केले. शनिवारी लंडनमधील संसद चौक अर्थात पार्लमेंट स्क्वेअर परिसरात हे आंदोलन त्याने केले.

तिथे आंदोलनात बोलताना त्याने भारतात आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, पण इथे लंडनमध्ये मात्र आम्ही आंदोलन करू शकतो. ज्या देशाने आमच्यावर राज्य केले, तिथे मात्र आंदोलनाची परवानगी आहे, बघा मोदी याला म्हणतात लोकशाही, असे ध्रूव राठी आंदोलनात बोलताना व्हीडिओत दिसतो. व्होट चोरीचा मुद्दाही त्याने उपस्थित केला. ध्रूव राठी म्हणतो की, माझ्या घरातून माझे अपहरण करण्यात आले. अनेक आंदोलकांना मारण्यात आले. ध्रूव राठी म्हणतो की, इथल्या परदेशस्थ भारतीयांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी भारतातील आपल्या नातेवाईकांना सांगावे की, देशात व्होट चोरी होते आहे.

हे ही वाचा:

सरकारी गृह कर्ज महागल्याने ग्राहकांना झटका

रात्री नूडल्स खाल्ले अन् सकाळी कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

जुनागढमध्ये संशयित बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

‘उदध्वस्त धर्मशाळां’च्या किंकाळ्या |

यावर काही स्थानिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. त्यात ध्रूव राठीने इथे लंडनमध्ये आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल उपस्थित केला. इथे येऊन लंडनमधल्या युवकांना भडकावण्याचा हा प्रयत्न आहे. जर तुमच्यात हिंमत आहे तर भारतात जाऊन आंदोलन करा, इथे आंदोलन करण्याची काय गरज आहे?

१० ऑक्टोबरला दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर प्रमाणे दुसरे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. पण त्यांचे पदाधिकारी अभिजित दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेण्यात आले. ध्रूव राठीच्या घरी पोलिस पोहोचले आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पहाटे सोडण्यात आल्यावर त्याने मीडियात मुलाखत देताना सांगितले की, आपण इथे आंदोलन करण्यासाठी आलो नव्हतो. तरीही आपल्याला घरातून उचलण्यात आले.

पण ध्रुव राठीने शुक्रवारी रात्री उशिरा ‘एक्स’वर एक निवेदन प्रसिद्ध करून आपण लंडनमध्ये पोहोचल्याची माहिती दिली होती. तसेच शनिवारी दुपारी १२ वाजता पार्लमेंट स्क्वेअरमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमण्याचे आवाहन त्याने केले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा