29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरस्पोर्ट्सरणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये रिंकू सिंहचे सलग दुसरे शतक

रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये रिंकू सिंहचे सलग दुसरे शतक

प्रियांश आर्या द्विशतकापासून एका धावेने हुकले

Google News Follow

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी रिंकू सिंहने सलग दुसरे शतक झळकावले, तर प्रियांश आर्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्यापासून अवघ्या एका धावेने हुकला. दुसरीकडे, शुभमन गिलचे रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन केवळ पाच चेंडूंपुरते मर्यादित राहिले. पंजाबचा कर्णधार उदय सहारनने नाबाद शतक झळकावत संघाला अडचणीतून बाहेर काढले.

न्यू चंदीगड येथील नव्या पीसीए स्टेडियमवर एलिट गट ‘ब’च्या सामन्यात उदय सहारनने १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा केल्या. त्यामुळे पंजाबने छत्तीसगडविरुद्ध दिवसअखेर ४ बाद २६९ धावा केल्या. दुसरीकडे, कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर रिंकू सिंहने १८६ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ११८ धावा करत उत्तर प्रदेशला संकटातून बाहेर काढले. उत्तर प्रदेशने गोव्याविरुद्ध ९ बाद २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गोव्याने १२ षटकांत एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या.

कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये रिंकू सिंहने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ११वे शतक झळकावले. या मोसमातील सलग सामन्यांमधील हे त्याचे दुसरे शतक आहे. रिंकूच्या नाबाद ११८ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने ९ बाद १३७ अशा अडचणीच्या स्थितीतून २०२ धावांपर्यंत मजल मारली. या मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रियांश आर्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याची संधी जवळपास साधली होती. मात्र, तो १९९ धावांवर बाद झाला आणि एका धावेने द्विशतक हुकले. दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने नाबाद ११५ धावा करत गुजरातविरुद्ध संघाची धावसंख्या ४ बाद ३८१ पर्यंत पोहोचवली.

हे ही वाचा:

सलमान रश्दी आणि मीरा नायर यांचा कॉकरोच आंदोलनाला पाठिंबा

स्मार्ट शेती, स्मार्ट शेतकरी

उद्धव ठाकरे स्वपक्षातील ‘रिजिम चेंज’ थांबवू शकले नाहीत!

आयपीओपूर्वी रिलायन्स जिओची मोठी तयारी

शुभमन गिल फक्त एक धाव

न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी या मोसमातील पहिला रणजी सामना खेळणारा शुभमन गिल पंजाबकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्याचे पुनरागमन निराशाजनक ठरले. गिलने केवळ एक धाव केली. छत्तीसगडचा फिरकीपटू अजय मंडलने त्याला पुढे येऊन खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर चेंडू गिलच्या बॅट आणि पॅडमधून निसटत थेट यष्टीवर आदळला. गिल बाद झाल्यानंतर उदय सहारन आणि प्रभसिमरन सिंह यांनी चौथ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करत पंजाबचा डाव सावरला.

एलिट गट ‘ब’मध्ये मनवंत कुमारने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे कर्नाटकच्या खालच्या फळीने संघाला सावरण्यास मदत केली. आलूर येथे सुरू असलेल्या सामन्यात सौराष्ट्रच्या जयदेव उनाडकट आणि चेतन सकारियाने सुरुवातीलाच कर्नाटकला धक्के दिले. मात्र, कर्नाटकने दिवसअखेर ८ बाद २८१ धावा केल्या.

मुंबईने हिमाचलला १४० धावांत गुंडाळले

एलिट गट ‘ड’मध्ये बिलासपूर येथे मुंबईने हिमाचल प्रदेशचा डाव अवघ्या १४० धावांवर संपवला. दिवसअखेर मुंबईने २ बाद १०७ धावा केल्या असून ते अजून ३३ धावांनी पिछाडीवर आहेत. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंहने ३४ धावांत चार विकेट घेतल्या, तर कर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोरने ४० धावांत चार विकेट घेतल्या. दोघांच्या शानदार गोलंदाजीमुळे तमिळनाडूने उत्तराखंडचा डाव ५६.२ षटकांत १३४ धावांवर गुंडाळला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा