28.4 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषपॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले

पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले

५० हजारांचा ठोठावला दंड

Google News Follow

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पॅरिस दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर तब्बल तीन तास रोखून ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला, असा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ‘वरून प्रचंड दबाव होता’, असे सांगितल्याचा दावाही पक्षाने केला आहे. या कथित प्रकारावरून ‘आप’ने केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

‘आप’चे पंजाबमधील माध्यमप्रमुख बलतेज पन्नू यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पॅरिसहून परतल्यानंतर मान यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन तास थांबवून ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या सामानाची तपासणी सुरू असल्याचे कारण देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पन्नू यांच्या दाव्यानुसार, तीन तासांनंतर मान यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. ते वाहनात सामान ठेवून निघण्याच्या तयारीत असतानाच काही अधिकारी पुन्हा त्यांच्याजवळ आले. संबंधित अधिकाऱ्यांनी आपण वरिष्ठांकडून प्रचंड दबावाखाली असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ५० हजार रुपयांचे चलन दिल्याचा आरोप पन्नू यांनी केला.

हे ही वाचा:

भारत-अमेरिका कराराच्या वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरूच; शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा!

मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!

‘ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू’

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

भगवंत मान यांच्या परदेश दौऱ्याच्या परवानगीवरून पंजाब सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. मान यांना फ्रान्स दौऱ्यासाठी राजकीय मंजुरी देण्यास केंद्राने नकार दिल्यानंतर पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने केंद्राचा निर्णय बाजूला ठेवत मान यांना पॅरिस दौऱ्याची परवानगी दिली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा