29.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषतिबेटमधील ७ रिश्टर स्केलच्या भूकंपात १६ जणांचा मृत्यू

तिबेटमधील ७ रिश्टर स्केलच्या भूकंपात १६ जणांचा मृत्यू

३०० हून अधिक घरे जमीनदोस्त

Google News Follow

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठे नुकसान केले असून या दुर्घटनेत जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे. रिश्टर स्केलवर ७.० तीव्रतेच्या भूकंपामुळे तिबेटच्या पठारी प्रदेशाला जोरदार धक्के बसले. गुरुवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ३२ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे ३०० हून अधिक घरे कोसळली आहेत.

स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी भूकंप झाला. रात्रीच्या वेळी नागरिक गाढ झोपेत असताना अचानक धक्के बसल्याने अनेकांना घराबाहेर पडण्याचीही पुरेशी संधी मिळाली नाही. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या तीव्रतेमुळे काही सेकंदांतच ३०० हून अधिक घरे कोसळली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांतील सदस्यांचा मृत्यू झाला असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर दूरसंचार सेवाही विस्कळीत झाल्याने अनेक भागांत अंधार पसरला.

चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर आणि अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीच्या मारू टाउनशिपमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. हे ठिकाण तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे ३९० किलोमीटर ईशान्येला आहे. भूकंपाचा हा परिसर समुद्रसपाटीपासून सुमारे ४,८६४ मीटर उंचीवर असून, तो दुर्गम आणि डोंगराळ भागात येतो. येथील अत्यंत थंड हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचणे तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचवणे कठीण ठरत आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकी; शाळा, रेसकोर्स निशाण्यावर?

म्यानमारमधील शस्त्र प्रशिक्षण प्रकरणी मॅथ्यू व्हॅनडाइक भारतात परतला

तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप

हवामान संकटाला विकसित देश जबाबदार

शुक्रवारी सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या नागरिकांपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्कालीन विभागाने संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात येत असून, कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरू असून, मृतांचा आकडा आणि नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा