29.6 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरराजकारणरेहान वाड्राच्या फोटो प्रकरणावरून राहुल गांधी - प्रियांका वाड्रात संघर्ष?

रेहान वाड्राच्या फोटो प्रकरणावरून राहुल गांधी – प्रियांका वाड्रात संघर्ष?

भाजपाने केला आरोप

Google News Follow

भाचा रेहान वाड्रा याच्या छायाचित्र प्रदर्शनातून काही छायाचित्रे हटवण्यात आल्याच्या वादावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मौन बाळगल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे. यातून या भावाबहिणीत काहीतरी संघर्ष आहे का, अशी शंका भाजपाने घेतली आहे.

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रश्न उपस्थित केला की, प्रियंका गांधी यांचा आपल्या भावावरील विश्वास उडाला आहे का? तसेच, वाद निर्माण करून त्या आपला मुलगा रेहान याला राजकीयदृष्ट्या ‘सॉफ्ट लॉन्च’ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी रविवारी वैयक्तिक भेटीसाठी व्हिएतनामला रवाना झाले असून, या वादावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केलेली नाही. भाजपने याच मुद्द्याचा आधार घेत गांधी भावंडांमध्ये मतभेद असल्याचा दावा केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित एसआयआर अनियमिततेच्या मुद्द्यावरून संयुक्तपणे आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, “प्रियंका वाड्रा यांचा संपूर्ण प्रयत्न वाद निर्माण करून आपल्या मुलाला ‘सॉफ्ट लॉन्च’ करण्याचा होता. त्यांचा राहुल गांधींवरील राजकीय विश्वास उडाला आहे! ते पुढे म्हणाले, “व्हिएतनाममधून राहुल गांधी प्रत्येक मुद्द्यावर पोस्ट करत आहेत; मात्र आतापर्यंत त्यांनी रेहान वाड्राच्या समर्थनार्थ एकही स्पष्ट पोस्ट केलेली नाही. काँग्रेसमध्ये प्रियंका विरुद्ध राहुल!”

कलाकार आणि छायाचित्रकार रेहान वाड्रा याने बुधवारी दावा केला की, दिल्लीतील अलीकडील विद्यार्थी आंदोलनांचे चित्रण करणारी त्यांच्या अनेक छायाचित्रे ‘नो आयडिया इज फायनल’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी बिकानेर हाऊस प्रशासनाने हटवली. या घटनेनंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रियंका गांधी यांनी ही कारवाई तरुणांचा आवाज “दाबण्याचा” प्रयत्न असल्याचे म्हटले.

रेहान यांनी इंडिया टुडेला सांगितले की, बुधवारी संध्याकाळी प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी बिकानेर हाऊस प्रशासनाने त्यांना त्यांच्या १०५ छायाचित्रांपैकी ७४ छायाचित्रे हटवण्यास किंवा त्याऐवजी दुसरी छायाचित्रे लावण्यास सांगितले. प्रदर्शन सुरू झाले तेव्हा केवळ ३५ फ्रेम्स शिल्लक राहिल्या होत्या.

हे ही वाचा:

सांताक्रूझ–गोरेगावदरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक!

पंतप्रधान मोदी, कॅप्टन स्मित यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी मशाल प्रज्वलनाचे निमंत्रण

टायगरवरील गोळीबारापूर्वी हल्लेखोरांच्या बंदुकीतून हॉटेलमध्ये सुटली गोळी

दिल्लीत समाजविघातक लोकांनी एकत्र येऊन सरकार बदलत नसते!

रेहानच्या म्हणण्यानुसार, हा संग्रह त्याच्या तीन वर्षांच्या मेहनतीतून साकार झाला होता. त्याने सांगितले की, १५ ऑक्टोबर रोजी, म्हणजे प्रदर्शनाच्या सुमारे आठवडाभर आधी त्यांनी प्रदर्शनाची मांडणी बिकानेर हाऊसला पाठवली होती आणि त्याची पोहोच मिळाल्याची पुष्टीही त्यांना मिळाली होती.

रेहानचे वडील रॉबर्ट वाड्रा यांनी इंडिया टुडेला सांगितले की, रेहानने प्रदर्शनाची मांडणी सुरू केल्यानंतरच त्यावर आक्षेप घेण्यात आला. या वादावर प्रतिक्रिया देताना बिकानेर हाऊसने स्पष्ट केले की, काही छायाचित्रे आयोजनस्थळाच्या धोरणाशी “सुसंगत नसल्याचे आढळून आले” होते.

भाजपने रेहान आणि बिकानेर हाऊस यांच्यातील ई-मेल पत्रव्यवहाराचे स्क्रीनशॉटही शेअर केले. भाजपच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या प्रदर्शन प्रस्तावामध्ये निसर्ग, वन्यजीव, अमूर्त कलाकृती, व्यक्तिचित्रे आणि शिल्पकला अशा विषयांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये कोणत्याही “राजकीय आशयाचा” उल्लेख नव्हता.

प्रदीप भंडारी यांनी म्हटले, “१० जून रोजी रेहान वाड्रा याने बिकानेर हाऊसला पाठवलेल्या ई-मेलमध्ये आणि त्यासोबत पाठवलेल्या प्रस्तावात प्रदर्शनामध्ये निसर्ग, वन्यजीव, कलाकृती आणि शिल्पकला अशा विषयांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते.”

बिकानेर हाऊसने ३० जून रोजी हा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर राजकीय छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आल्याचा दावा भाजपने केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा