30.2 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामापोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली

पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली

वर्ध्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

Google News Follow

न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांसमोरच महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. डॉ. श्रद्धा भूमरे असे संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. कादिर अली रज्जाक अली असे आरोपीचे नाव असून, ही संपूर्ण घटना आरोग्य केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणले होते. तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीला आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. त्याने स्वाक्षरी केल्यानंतर अचानक डॉ. भूमरे यांच्या गालावर चापट मारली. त्यावेळी आरोग्य केंद्रात पोलीस कर्मचारी उपस्थित होते. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी स्थानिक रहिवासी असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

महापौर, अमिताभ, दिलजित दोसांजसह शाळांना बॉम्बची धमकी

म्यानमारमधील शस्त्र प्रशिक्षण प्रकरणी मॅथ्यू व्हॅनडाइक भारतात परतला

तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप

हवामान संकटाला विकसित देश जबाबदार

या घटनेनंतर शासकीय डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली नाही, असा आरोप डॉक्टर संघटनेने केला आहे. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींनी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी वान्मती सी. यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यासह त्याला घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य होऊन कारवाई सुरू होईपर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा