29.2 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरस्पोर्ट्सतिलक-अर्शदीपचा विक्रमांचा धमाका!

तिलक-अर्शदीपचा विक्रमांचा धमाका!

Google News Follow

न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय क्रिकेटपटूंनी विक्रमांचा पताका फडकवला. तिलक वर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला, तर अर्शदीप सिंगने एका वर्षात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. या दोघांच्या चमकदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला दुसऱ्या टी-२० सामन्यात २० षटकांत ५ बाद १८० धावांवर रोखण्यात भारताला यश आले.

तिलक वर्माने या सामन्यात टीम सीफर्ट आणि डॅरिल मिचेल यांचे झेल टिपत २०२६ मधील आपली झेलसंख्या २६ वर नेली. यापूर्वी इंडोनेशियाच्या डॅनिलसन हावोच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात २५ झेल घेण्याचा विक्रम होता. तिलकने हा विक्रम मोडीत काढत क्षेत्ररक्षणातील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने यंदा ३० डावांत २६ झेल घेतले आहेत.

दुसरीकडे, अर्शदीप सिंगने चार षटकांत ३३ धावा देत दोन बळी मिळवले. त्याने टीम सीफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांना माघारी धाडले. या दोन बळींसह अर्शदीपच्या २०२६ मधील टी-२० आंतरराष्ट्रीय बळींची संख्या ३८ झाली. त्याने २०२२ मध्ये ३७ बळी घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा भारतीय विक्रम मागे टाकला. जागतिक स्तरावर एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अर्शदीप संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयर्लंडचा जोश लिटल ३९ बळींसह अव्वल आहे.

फिलिप्स-जॅकब्सची झुंज

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. मात्र, ग्लेन फिलिप्स आणि बेवन जॅकब्स यांनी दमदार फलंदाजी करत डावाला आकार दिला. फिलिप्सने ४३ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह ७० धावा केल्या, तर जॅकब्सने ४६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७६ चेंडूंत ११६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला १८० धावांपर्यंत मजल मारता आली.

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यात तिलक आणि अर्शदीप यांच्या विक्रमी कामगिरीने भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा