28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरस्पोर्ट्सईडन पार्कवर भारत अपराजित

ईडन पार्कवर भारत अपराजित

Google News Follow

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या भारतीय संघाचे आता ऑकलंडमधील ईडन पार्कवरही वर्चस्व गाजवण्याचे लक्ष्य असेल. उभय संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना शुक्रवारी ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत खेळलेले तिन्ही टी-२० सामने जिंकले असून, यंदाही हा विजयी विक्रम कायम राखण्याची संधी संघाकडे आहे.

भारताने २०१९ मध्ये ईडन पार्कवर पहिला टी-२० सामना खेळताना न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर २०२० मधील दौऱ्यात याच मैदानावर झालेल्या दोन सामन्यांतही भारताने बाजी मारली. पहिल्या सामन्यात सहा गडी, तर दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून विजय मिळवत भारताने या मैदानावरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

मालिकेत भारताची ३-० अशी विजयी आघाडी

भारतीय संघाने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना तीन गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा केल्या. डॅरिल मिचेलने ५२ चेंडूंत नाबाद ८९ धावा, तर फिन अ‍ॅलनने २५ चेंडूंत ४० धावा केल्या.

मात्र, भारताने या आव्हानाचा धडाकेबाज पाठलाग केला. अभिषेक शर्माने अवघ्या ३८ चेंडूंत ११३ धावांची वादळी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने १९ चेंडूंत ४५ धावा कुटल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने अवघ्या १३.२ षटकांत चार गडी गमावून विजय मिळवला.

त्याआधी दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून मात केली होती. पहिल्या सामन्यातही भारताने २२६ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीपणे पार करत चार गडी राखून विजय मिळवला होता.

हाऊसफुल्ल ईडन पार्कमध्ये रंगणार सामना

चौथ्या टी-२० सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, न्यूझीलंड क्रिकेटच्या माहितीनुसार ईडन पार्कमधील सर्व ४० हजार तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील विजयी आघाडी भारताकडे असली, तरी घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा संघ पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत भारताचा ईडन पार्कवरील अपराजित विक्रम कायम राहणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा