29.1 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरविशेषबंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का

दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू

Google News Follow

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने दोन विदेशी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) संध्याकाळी हळसूरू परिसरातील कॉनराड पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील स्विमिंग पूलमध्ये दोघे पोहत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेमुळे हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली असून पंचतारांकित हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या दुर्घटनेत अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थिस (वय ५७) आणि जुराज होर्वॅट (वय ४५) यांचा मृत्यू झाला. अलेक्झांडर हे जर्मनीचे नागरिक असून लुफ्थांसा एअरलाइनमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते. तर जुराज हे स्लोव्हाकियाचे नागरिक असून आयबीएम कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. दोघेही या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. स्विमिंग पूलमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, विजेचा प्रवाह नेमका कुठून आला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
हे ही वाचा:
बाथरुममध्ये पडून दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण यांचा आज वाढदिवस

यास्तिका भाटियाचे ब्रिस्बेन हीटकडून पदार्पण

वनडे संघात जडेजाचे पुनरागमन कठीण

दोघांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी एका अमेरिकन पर्यटकाने आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्याने तातडीने धाव घेतली. मात्र, बचावकार्यादरम्यान या दोघांनाही विजेचा धक्का बसला. मॅथ्यू डिसँटिस (वय ४१) आणि पूल अटेंडंट राहुल तिवारी (वय २८) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोघांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, मृतांपैकी एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी हॉटेल व्यवस्थापनाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. स्विमिंग पूलच्या विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड होता का, देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते का आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची चौकशी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेलमधील स्विमिंग पूल ३१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आलिशान सुविधा आणि महागड्या सेवांचा दावा करणाऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या जीविताची सुरक्षा किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा