29.1 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरस्पोर्ट्समनीषा भानवालाची ऐतिहासिक सुवर्णभरारी!

मनीषा भानवालाची ऐतिहासिक सुवर्णभरारी!

Google News Follow

भारतीय कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, अशी कामगिरी हरियाणाच्या मनीषा भानवालाने केली आहे. कझाकिस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत तिने नवा इतिहास घडवला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिचे विशेष अभिनंदन केले असून, हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

अंतिम फेरीतील मनीषाचा संघर्ष थक्क करणारा होता. अमेरिकेच्या अॅबिगेल एलिझाबेथ नेटे हिच्याविरुद्धच्या लढतीत मनीषा सुरुवातीला ०-६ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र, तिने हार न मानता जबरदस्त झुंज दिली. आक्रमक डावपेच आणि अफाट जिद्दीच्या जोरावर तिने सामन्याचे चित्रच पालटले आणि ८-६ अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

मनीषाच्या या कामगिरीचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडियावरून कौतुक केले. जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा मान मिळवून तिने देशाची मान उंचावली असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही तिचे अभिनंदन करत भारतीय कुस्तीसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याची भावना व्यक्त केली.

रोहतक येथे जन्मलेल्या २९ वर्षीय मनीषाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही तितकाच दमदार राहिला. उपउपांत्यपूर्व फेरीत तिने कॅनडाच्या लॉरेन्स ब्युरेगार्डचा ६-२ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूवर मात करत अंतिम फेरी गाठली.

विशेष म्हणजे, यापूर्वी अंशू मलिक, काजल धोचक आणि नीलम सिरोही यांनाही जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. मनीषाने ही प्रतीक्षा संपवली. या स्पर्धेत भारताने एकूण चार पदकांची कमाई केली. त्यात दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश असून, तनू शर्माने ७२ किलो गटात कांस्यपदक पटकावले. मनीषाच्या या ऐतिहासिक सुवर्णकामगिरीने भारतीय महिला कुस्तीला नवी दिशा आणि नवी प्रेरणा दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा