29.6 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरबिजनेसइराण युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांच्या तेल गुंतवणुकीत ४३ टक्क्यांची वाढ!

इराण युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांच्या तेल गुंतवणुकीत ४३ टक्क्यांची वाढ!

मध्यावधी निवडणुकांपूर्वी नवा राजकीय वाद

Google News Follow

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण युद्धाच्या काळात ट्रम्प यांच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील गुंतवणुकीचे मूल्य तब्बल ४३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा अमेरिकी संसदेच्या जॉइंट इकॉनॉमिक कमिटीतील डेमोक्रॅट सदस्यांच्या अहवालात करण्यात आला आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य ८१.६ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ७२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे अहवालात म्हटले आहे.

विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण युद्धाला सुरुवात झाल्यानंतर ट्रम्प यांच्या गुंतवणूक खात्यांमधून मार्च ते ऑगस्टदरम्यान ४.७ दशलक्ष ते १७.५ दशलक्ष डॉलर मूल्याचे तेल आणि वायू कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यात आले. २०२६ मधील त्यांच्या एकूण तेल क्षेत्रातील शेअर खरेदीपैकी ९४ टक्क्यांहून अधिक व्यवहार युद्ध सुरू झाल्यानंतर झाल्याचा दावा अहवालात आहे. शेवरॉन आणि एक्सॉनमोबिल या कंपन्यांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक असल्याचेही समोर आले आहे.
हे ही वाचा:
दिवाळीआधी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

कॉक्रोच जनता पार्टीचा इंडी आघाडीच्या रॅलीत सहभाग नाही

हवाय इंटरनेट दळणवळणावर लक्ष ठेवणारा मॉनिटर

कसलं म्हणूनसुख नाही !

या प्रकरणात ७ एप्रिल रोजी झालेल्या व्यवहाराने विशेष लक्ष वेधले. याच दिवशी ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली होती. त्याच दिवशी त्यांच्या खात्यांतून एक्सॉनमोबिलचे ५ लाख ते १० लाख डॉलर मूल्याचे शेअर्स विकण्यात आले. मात्र, या व्यवहाराचा युद्धविरामाच्या घोषणेशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा अहवालात देण्यात आलेला नाही. व्हाइट हाऊसनेही आरोप फेटाळत ट्रम्प यांची गुंतवणूक स्वतंत्र वित्तीय संस्थांकडून व्यवस्थापित केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, युद्धामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत असताना सामान्य अमेरिकी नागरिकांना मात्र महाग इंधनाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत पेट्रोलचे दर प्रति गॅलन २.८७ डॉलरवरून ४.२९ डॉलर, तर डिझेलचे दर ३.६८ डॉलरवरून ६.२८ डॉलरपर्यंत पोहोचल्याचा अहवालात दावा आहे. ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची गुंतवणूक, तेल कंपन्यांचा नफा आणि वाढती महागाई हे मुद्दे अमेरिकेच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा