29.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरविशेषब्रिटिश दाम्पत्याला एवढी भावली देशी रिक्षा की थेट घेऊन गेले मायदेशी!

ब्रिटिश दाम्पत्याला एवढी भावली देशी रिक्षा की थेट घेऊन गेले मायदेशी!

७५ दिवस भारतभ्रमंतीनंतर घेतला निर्णय

Google News Follow

परदेशात फिरायला आल्यानंतर पर्यटक भारतातून काय काय घेऊन जातात? मसाले, कपडे, हस्तकला किंवा काही खास भेटवस्तू! पण एका ब्रिटिश दाम्पत्याने या सगळ्यांना मागे टाकत चक्क भारतीय ऑटोरिक्षाच आपल्या मायदेशी नेली आहे. हेलन आणि मिक या ब्रिटिश जोडप्याला भारतभ्रमंतीदरम्यान एक लाल रंगाची बजाज ऑटोरिक्षा इतकी आवडली की, त्यांनी तिच्याशी कायमची मैत्रीच केली. या रिक्षाचे नावही त्यांनी मजेशीरपणे ‘टिम्मी द टिन कॅन’ असे ठेवले. विशेष म्हणजे, या रिक्षातून त्यांनी तब्बल ७५ दिवस भारताची सफर केली आणि सुमारे ४ हजार २१८ किलोमीटरचे अंतर पार केले.

या प्रवासात ताजमहालासह भारतातील अनेक पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. भारतीय रस्त्यांवरील गर्दी, हॉर्नचा आवाज, वाहतुकीची गडबड आणि रिक्षाचा भन्नाट प्रवास या सगळ्याचा अनुभव घेताना टिम्मी त्यांची जणू तिसरी प्रवासी सोबतीच बनली. भारतभ्रमंती संपली, आता रिक्षाला भारतातच सोडून जायचे, हा विचारही त्यांना पटला नाही. अखेर आठवणींसोबत रिक्षालाही मायदेशी घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
हे ही वाचा:
भारताने पाचवा सामनाही गमावला, पण मालिका जिंकली!

रामलीलाचा ४० टक्के भाग रिकामा, होते कुठे १० लाख लोक?

कर्नाटकातला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याची ख्रिस्ती धर्मगुरूंची मागणी

१० लाखांच्या दाव्याचे रामलीला मैदानात दहन

त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून टिम्मीला जहाजातून ब्रिटनला पाठवण्यात आले. तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही रिक्षा लंडनमधील लंडन गेटवे बंदरावर पोहोचली. आता ब्रिटनमध्येही भारतीय रिक्षेची एंट्री झाली आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी या अनोख्या प्रवासाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि हा किस्सा चर्चेत आला.

मात्र, टिम्मीला लगेच ब्रिटनच्या रस्त्यांवर फेरफटका मारता येणार नाही. त्यासाठी तेथील वाहन नोंदणी, सुरक्षा नियम आणि तांत्रिक चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच, भारतात रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतलेल्या टिम्मीला आता ब्रिटिश नियमांची परीक्षा द्यावी लागणार आहे! एकंदरीत, भारतात फिरायला आलेल्या या जोडप्याने भारताची आठवण म्हणून एखादी वस्तू नाही, तर चक्क रिक्षाच सोबत नेली. त्यामुळे आता ब्रिटनमध्येही भारतीय रिक्षाचा ‘भाईगिरी’ अंदाज पाहायला मिळणार आहे!

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा