28.5 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरविशेषप्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

आगाऊ तिकीट विक्री ५० कोटींच्या उंबरठ्यावर

Google News Follow

बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीतून भारतात आतापर्यंत ४५.९६ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना आगाऊ बुकिंगचा आकडा ५० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आकडेवारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत चित्रपटाची ११.०१ लाख तिकिटे विकली गेली होती. देशातील ५२७ शहरांमधील १,७०८ चित्रपटगृहांत एकूण ३५,६९७ शोजसाठी हे बुकिंग झाले आहे. आरक्षित ठेवलेल्या मात्र प्रत्यक्ष विक्री न झालेल्या जागांचे पैसे वगळल्यास आगाऊ बुकिंगमधील कमाई ३६.८५ कोटी रुपये आहे.

हे ही वाचा:

दिल्लीच्या प्रदूषण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६८ लाखांचा दंड

‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच फ्लोरिडात खासगी जेट कोसळले

ममता म्हणतात, जे काफिर ते घाबरतात!

रामलीलाचा ४० टक्के भाग रिकामा, होते कुठे १० लाख लोक?

आगाऊ बुकिंगमध्ये दिल्ली आघाडीवर

चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या आगाऊ तिकीट विक्रीतूनच २५.३९ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. आरक्षित जागांचे पैसे वगळल्यास हा आकडा २१.३० कोटी रुपये आहे. म्हणजेच एकूण आगाऊ तिकीट विक्रीतील निम्म्याहून अधिक वाटा पहिल्या दिवसाच्या बुकिंगचा आहे. शहरनिहाय आकडेवारीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आघाडीवर आहे. येथे ६.७८ कोटी रुपयांचे बुकिंग झाले आहे. त्यानंतर मुंबईत ६.०८ कोटी, बंगळुरूमध्ये ५.७९ कोटी, हैदराबादमध्ये २.८१ कोटी आणि पुण्यात २.१७ कोटी रुपयांची आगाऊ तिकीट विक्री झाली आहे. राज्यनिहाय विचार करता महाराष्ट्र ९.४२ कोटी रुपयांच्या बुकिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा