28.5 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरराजकारणपंजाबमध्ये ‘आप’ला गळती; आणखी एका आमदाराचा राजीनामा

पंजाबमध्ये ‘आप’ला गळती; आणखी एका आमदाराचा राजीनामा

अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप यांचा पक्षाला रामराम

Google News Follow

आम आदमी पार्टीला (आप) पंजाबमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पटियाला जिल्ह्यातील दोन आमदारांनंतर आता अमृतसर उत्तर मतदारसंघाचे ‘आप’चे आमदार कुंवर विजय प्रताप यांनीही राजीनामा दिला आहे. गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. याच नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. आपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून पक्षाला गळती सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

कुंवर विजय प्रताप सिंह यांना जून २०२५ मध्येच आम आदमी पार्टीतून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे नेतृत्व आणि पंजाब सरकारच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. कुंवर विजय प्रताप यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमृतसरमधील माझ्या बंधू-भगिनींनो, मी पंजाब विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तुम्ही मला दिलेले प्रेम आणि सन्मान यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा ऋणी राहीन. तुमच्या सहकार्याने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील. किरकोळ राजकारण आणि केवळ उद्घाटनांपुरते मर्यादित असलेल्या विचारसरणीच्या पलीकडे जावे लागेल. आज पंजाब अमली पदार्थांचे व्यसन, खंडणी, गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे. अशा परिस्थितीत पंजाबला पुन्हा एकदा प्रगत आणि समृद्ध राज्य बनवण्याची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमदार म्हणून मी माझ्यापुढील ९० टक्के उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. म्हणजेच, एका आमदाराने करणे अपेक्षित असलेली सर्व कामे पूर्ण केली आहेत. याशिवाय नगरसेवक, महापौर आणि खासदार यांच्या कार्यकक्षा वेगवेगळ्या असतात. मी केलेल्या कामांचा विभागनिहाय तपशीलही दिला आहे. तो वृत्तपत्रांमध्ये आणि माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. माझी सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे राजकारणातील ‘माय-बाप’ म्हणजेच हुकूमशाही संस्कृती संपवून जनतेला प्रेरणास्थान मानून काम केले.”

हे ही वाचा:

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

दिल्लीच्या प्रदूषण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६८ लाखांचा दंड

‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच फ्लोरिडात खासगी जेट कोसळले

ममता म्हणतात, जे काफिर ते घाबरतात!

पंजाब विधानसभेत आपण नेहमीच अमृतसरमधील नागरिकांचे प्रश्न मांडल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी आणि सांडपाण्याच्या समस्यांपासून ते सर्किट हाऊस, कंपनी बाग, अस्वच्छ नाले, गुरु नानक देव विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्वरूप राणी महाविद्यालय आणि बरगारी येथील धार्मिक ग्रंथाच्या अवमानाच्या प्रकरणापर्यंत विविध मुद्दे आपण ठामपणे उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा